ठळक मुद्देमाझ्यासाठी घराचे प्रवेशद्वार वेगळे असून घरातील एक वेगळा फ्लोअर मला राहाण्यासाठी देण्यात आला आहे. हे खरे तर खूप वाईट आहे. पण माझ्या कुटुंबातील कोणीच माझ्याशी बोलत नाही की मला पाठिंबा देत नाही. 

बॉलिवूड कलाकारांची मुले बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी फिल्मी पार्ट्यांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळते. पण अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना खूपच कमी वेळा कोणत्या समारंभात अथवा पार्टीमध्ये दिसते. सुनैना रोशनची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हटले जात होते. पण या सगळ्या अफवा असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले. 

सुनैना रुग्णालयात आहे अशा चर्चा होत असताना सुनैनाने एक ट्वीट करत सगळ्यांना बुचकळ्यात टाकले होते. तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की, मी खूप आजारी असून रुग्णालयात आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या फ्रेंड्ससोबत पार्टी करत आहे.  

सुनैनाबद्दल पसरलेल्या या अफवांनंतर तिने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली आहे. तिने मुलाखतीत म्हटले आहे की, मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत चेंबूरमधील गल्फ क्लबमध्ये पार्टी करत होते. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवा का पसरवल्या जात आहेत हेच मला कळत नाहीये. मी बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचे देखील म्हटले जात आहे. पण मला असा कोणताही आजार नाहीये. सुनैनाला गेल्यावर्षी लंडनच्या रिहॅबमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याविषयी बोलताना तिने सांगितले की, मी काही आठवड्यांसाठी तिथे होते. पण आता मी पूर्णपणे त्यातून बाहेर आले आहे. माझ्या वडिलांना कॅन्सर आहे हे कळल्यानंतर मी तिथून भारतात परतले होते. 

सुनैनाने गेल्या आठवड्यात एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरून तिच्या आयुष्यात काहीतरी समस्या असल्याचे दिसून येत होते. याविषयी तिला पिंकव्हिलाने विचारले असता तिने सांगितले की, माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्यात काही तणाव आहे. पण त्याच्याबद्दल मला बोलायचे नाहीये. मी काही दिवस दुसरीकडे देखील राहात होते. पण आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आहे. पण माझ्यासाठी घराचे प्रवेशद्वार वेगळे असून घरातील एक वेगळा फ्लोअर मला राहाण्यासाठी देण्यात आला आहे. हे खरे तर खूप वाईट आहे. पण माझ्या कुटुंबातील कोणीच माझ्याशी बोलत नाही की मला पाठिंबा देत नाही.  

सुनैनाला भावाप्रमाणे अभिनयात रस नाहीये. पण तिला दिग्दर्शनात इंटरेस्ट असून तिने तिच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांसाठी त्यांना असिस्ट केले आहे. क्रेजी 4 या चित्रपटाच्यावेळी वडिलांसोबत काम करत असताना तिला सर्वायकल कॅन्सर झाले असल्याचे कळले होते आणि त्यावर तिला उपचार घ्यावे लागले होते. किमोथेरपी केल्यामुळे तिचे संपूर्ण केस गेले होते आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या सगळ्यामुळे तिचे खाण्यावर नियंत्रण नव्हते आणि तिचे वजन तब्बल 140 किलो इतके झाले होते. सुनैना रोशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे वजन 140 किलो झाले असल्याने तिला प्रचंड त्रास होत होते. अखेरीस तिने शरीरातील फॅट काढण्यासाठी सर्जरी केली आणि तिचे वजन 65 किलो झाले. वजनामुळे तिला प्रंचड त्रास व्हायचा. थोडे देखील चालल्यानंतर तिला धाप लागायची. पण या सगळ्यावर तिने मात केली. 

Web Title: Nobody has spoken to me, they are not even supporting me', Hrithik's sister Sunaina Roshan speaks up about her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.