शरीरावर पांढरे डाग पण ते... ! सुशात सिंग राजपूतचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:50 PM2020-08-11T14:50:00+5:302020-08-11T14:50:54+5:30

काय सांगतो फॉरेन्सिकचा अहवाल?

no poison was given to sushant singh rajput many important information found in forensic report | शरीरावर पांढरे डाग पण ते... ! सुशात सिंग राजपूतचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला

शरीरावर पांढरे डाग पण ते... ! सुशात सिंग राजपूतचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला

googlenewsNext
ठळक मुद्दे हा फॉरेन्सिक अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही दाखल करण्यात आला आहे.  

सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा अहवाल आधीच आला होता. आता कलिना फॉरेन्सिक लॅबने आपला फॉरेन्सिक अहवालही दिला आहे.  कलिना फॉरेन्सिक लॅबमधून  टॉक्सिकोलॉजी, सायबर, लिजीचर मार्क, नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉश हे अहवाल  समोर आले आहेत. या अहवालांमध्ये कोणत्याही प्रकारचा फॉउल प्ले आढळला नसून हे सर्व अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जोडले आहेत.
स्टमक वॉश रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, सुशांतला मृत्यूपूर्वी कुठल्याप्रकारची विषारी वस्तू किंवा विष देण्यात आले नव्हते.
नेल सॅम्पलिंग अहवालामध्ये कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या खुणा आढळलेल्या नाही.

शरीरावर आढळलेले पांढरे डाग पण ते थुंकीचे...
 अहवालानुसार सुशांतच्या मृतदेहावर आढळलेले पांढरे डाग त्यांच्या थुंकीचे आहेत, जे मृत्यूनंतर तोंडातून बाहेर आले होते. त्यानंतर ते कपड्यांवरच वाळल्यामुळे तिथे पांढरे डाग तयार झाले. या अहवालानुसार ते कोणतेही स्ट्रगल मार्क नाही आहेत. लीजिचर मार्कमध्ये देखील कोणतेही झटापटीचे किंवा जखम असणा-या खुणा सापडल्या नाहीत.


 
 हा फॉरेन्सिक अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही दाखल करण्यात आला आहे.  
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.

Web Title: no poison was given to sushant singh rajput many important information found in forensic report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.