No member of Sushant Rajput Singh's family knows Sandeep Singh | सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही संदीप सिंगला

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही संदीप सिंगला

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सर्वात पहिला व्यक्तीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे मित्र व निर्माता संदीप सिंग होता. काही व्हिडिओ व फोटोमध्ये संदीप सिंग सुशांतच्या बहिणीचे सात्वंन करताना दिसत होता आता नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत सिंग राजपूतच्या फॅमिली फ्रेंडने सांगितले की सुशांतच्या कुटुंबातील कोणीच संदीप सिंगला ओळखत नाही.

सुशांतच्या फॅमिली फ्रेंडने सांगितले की, संदीपने सुशांत सिंग राजपूतचे पार्थिव कूपर हॉस्पिटलला नेण्यासाठी जोर दिला होता आणि संदीपचा पीआरच सुशांतच्या बहिणीसोबत फोटो काढत होता. त्यांनी हेदेखील सांगितले की, सुशांतच्या जवळचे मित्रदेखील संदीप सिंग कोण आहे.

तसेच त्यांनी हेदेखील सांगितले की काही वर्षांपूर्वी संदीप सुशांतचा खूप क्लोज होत होता. त्यांनी हेदेखील सांगितले की, सुशांतच्या घरी पोहचल्यानंतर संदीपच सगळ्यांना आदेश देत होता. सुशांतच्या फॅमिली फ्रेंडने हेदेखील सांगितले की, संदीप सिंगने कित्येक वेळा आपले स्टेटमेंट बदलले आहे.

संदीप सिंगने सुशांतसोबत फोटो शेअर केले आहेत. त्याचा दावा आहे की तो सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे व सुशांतसोबत एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होता. सुशांतच्या निधनानंतर संदीप सिंग त्यांच्या पटनातील घरीदेखील गेला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No member of Sushant Rajput Singh's family knows Sandeep Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.