छैय्या छैय्या गर्ल  आणि बॉलिवूडची मुन्नी असे जिच्याबद्दल बोलले जाते ती अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. सगळ्यात जास्त चर्चेत असते ती मलायकाच. तिच्या करिअरपेक्षा ती तिच्या आयुष्यातील खाजगी घडामोडींमुळेच जास्त चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

अर्जुन कपूरसह असलेल्या अफेअरमुळे तिच्यावर खुमासदार चर्चाही रंगतात. ती लवकरच अर्जुन कपूरसह लग्न करणार असल्याच्याही बातम्या येतात. मात्र अजुन तरी तिच्या लग्नाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मलायकाचा एक फोटो समोर आला आहे. यांत ती तिच्या आईसह रिक्षाने बाहेर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 


हा फोटो पाहून यापूर्वी कधीच मलायकाचा अशा रितीने फिरण्याचे ऐकले नव्हते. मात्र पहिल्यांदाच मलायकाला ना कोणत्या आलिशान गाडीतून नाही तर रिक्षाने फिरताना पाहायाला मिळाल्याने वेगवेगळे प्रश्न नेटीझन्सना पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मलायकाची ड्रेसिंग स्टाईलही अगदी साधी होती. आता पर्यंत मलायकाने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्टा समजली जाणारी मलायकाचा रिअल लाइफमध्येही सुंदर दिसत असली तरी यावेळी तिचा अंदाजही सर्वसामान्यांप्रमाणे होता. 

काही दिवसांआधीच तिने तिच्या दुस-या लग्नाविषयी खास गोष्टी सांगितल्या होत्या. बीचवर लग्न करण्याची इच्छा असल्याचं  तिने सांगितलं होतं. त्यासोबतच तिला Elie Saab gown गाऊन परिधान करायचं असल्याचंही ती म्हणाली. माझ्या लग्नाची थीमसुद्धा पांढरा रंगच असेल. त्यामुळे आमच्या कपड्यांपासून ते डेकोरेशपर्यंत साऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात येईल”, असं मलायका म्हणाली.

Web Title: No luxury Car, No luxurious Lifestyle, after divorce Malaika Arora Facing Money Problem now Roaming in auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.