गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय ड्रीम गर्ल म्हणून त्यांची ओळख आहे. हेमा मालिनी यांनी बॉलीवुडमध्ये जे स्थान मिळवलं आहे ते कुणीच मिळवू शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सिनेमात काम केलेले नाही. असं असलं तरी त्याचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. हेमा मालिनी यांच्या संपत्तीबद्दल विचार केल्यास आजच्या अभिनेत्रींनाही त्या टक्कर देतील इतकी संपत्ती असल्याचं चर्चा आहेत.

 


हेमा मालिनी  हेमा मालिनी लोकसभा खासदार निवडून येण्यापूर्वी दोनदा राज्यसभेच्या सदस्यदेखील राहिल्या आहेत.खासदारांना त्यांचं वेतन मिळत असतं. ते वेतन हेमा यांनाही मिळतं. आयुष्यभरातील कमाईतून त्यांनी नक्कीच काही ना काही बचत केली असणार. याशिवाय पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं गलेलठ्ठ मानधन त्यांना मिळतं. 


हेमा मालिनी यांच्या मुलीच्या जन्माच्यावेळी चाहत्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून धर्मेंद्र यांनी पूर्ण हॉस्पिटलच त्यांच्या नावे बुक केले होते. नुकताच कपिल शर्मा शोमध्ये हेमा मालिनी यांनी खुद्द हा किस्सा सांगितला होता.

Web Title: No Film, No Ad, No Tv Show, Then What Is Source OF Income For Hema Malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.