ठळक मुद्देनीतू यांनी 1972मध्ये ‘रिक्शावाला’ सिनेमामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग यांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम करतोय. होय, या व्हिडीओत नीतू त्यांची नात समारासोबत टिकटॉक व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. समारा डान्स करतेय आणि नीतू तिच्या डान्स स्टेप फॉलो करताहेत. आजी-नातीचा हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला असून सध्या तो व्हायरल होतोय.
 आजी नातीचा हा व्हिडीओ नीतू यांच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नीतू यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘सॅमने Tiktok Thingy करण्यासाठीआग्रह केला. मी फक्त तिला फॉलो केले. कधीकधी आपल्या व्यक्तिंना आनंद देण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात,’ असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी दिले आहे.
 व्हिडीओत नीतू सिंग काही ठिकाणी गोंधळतात, पण नातीसोबत डान्स स्टेप करताना त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. व्हिडीओ पाहून चाहते पुन्हा एकदा त्यांच्यावर फिदा झाले आहेत.  coolest mom आणि coolest nani अशा अनेक कमेंट्ससह चाहत्यांनी त्यांच्या फिटनेसचेही कौतुक केले आहे.

 नीतू यांनी 1972मध्ये ‘रिक्शावाला’ सिनेमामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. ‘यादो की बारात’ सिनेमामधून त्यांना खरी ओळख मिळाली. 1975मध्ये पहिल्यांदा त्यांचा ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला.

नीतू यांनी आपल्या काळात ऋषी कपूर यांच्यासह 11 सिनेमे केले. ऋषीसह काम करतात करता नीतू सिंह त्यांच्या प्रेमात पडल्या आणि 1979मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर नीतू सिंहने केवळ ऋषी कपूर यांच्यासह काम केले.

Web Title: Nitu Singh follow grand daughter samara moves tiktok video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.