प्रियंका चोप्राचा जुना फोटो पाहून निक जोनासने दिली ही रोमँटिक कमेंट, पाहा तिचा हा जुना फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:58 PM2021-02-10T12:58:52+5:302021-02-10T13:02:17+5:30

प्रियंकाच्या एका मैत्रिणीने तिचा एक १५ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका तिच्या मैत्रिणीसोबत आपल्याला दिसत आहे.

Nick Jonas’ reaction to Priyanka Chopra’s teenage pic with a childhood friend | प्रियंका चोप्राचा जुना फोटो पाहून निक जोनासने दिली ही रोमँटिक कमेंट, पाहा तिचा हा जुना फोटो

प्रियंका चोप्राचा जुना फोटो पाहून निक जोनासने दिली ही रोमँटिक कमेंट, पाहा तिचा हा जुना फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियंकाच्या या पुस्तकासोबतच तिचा एका जुन्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रियंकाच्या एका मैत्रिणीने तिचा एक १५ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ग्लोबल ऑयकॉन प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवते आहे. प्रियंका सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्राला घेऊन चर्चेत आहे. 'अनफिनिश्ड'मध्ये तिने तिच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने चांगल्या आणि वाईट गोष्टींचा उल्लेख केला आहे. प्रियंकाचे फॅन्स पुस्तकाचे सोशल मीडियाद्वारे प्रचंड कौतुक करत आहेत. 

प्रियंकाच्या या पुस्तकासोबतच तिचा एका जुन्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रियंकाच्या एका मैत्रिणीने तिचा एक १५ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका तिच्या मैत्रिणीसोबत आपल्याला दिसत आहे. मरिन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रियंका तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली दिसत आहे. प्रियंकाने तिच्या या फोटोवर एक इमोशनल कमेंट लिहिली आहे. तिने आई लव्ह यू क्वीन असे लिहिले आहे. प्रियंकाचा हा फोटो तिचा पती निक जोनसला देखील खूप आवडला आहे. त्याने या फोटोवर हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत फेव्हरेट कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे नेहमी चर्चेत येत असतात. ही जोडी मागील दोन वर्षांपासून एकत्र आहेत आणि आपल्या विवाहित जीवनात खूश आहेत. प्रियंका चोप्राचे लग्न निक जोनससोबत राजस्थानमधील जोधपूरमध्ये २०१८ साली झाले होते. निक आणि प्रियंकाची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. निक जोनस आणि प्रियंका चोप्राने दोन महिने एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर दोघांनी जुलै २०१८ ला साखरपुडा केला.

Web Title: Nick Jonas’ reaction to Priyanka Chopra’s teenage pic with a childhood friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.