new ranu mondal viral video on twitter women singing jo wada kiya woh | या महिलेचा आवाज ऐकाल तर रानू मंडलला विसराल,  व्हिडीओ व्हायरल

या महिलेचा आवाज ऐकाल तर रानू मंडलला विसराल,  व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देया ट्विटर पोस्टवर नेटक-यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनवर भीक मागून पोट भरणारी रानू मंडल आज स्टार आहे. तिचा गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने कमाल केली. या व्हिडीओने रानूला एका रात्रीत स्टार बनवले. केवळ इतकेच नाही तर रानू थेट बॉलिवूडच्या स्टुडिओत पोहोचली. हिमेश रेशमियाने रानूला गाण्याची संधी दिली आणि रानू स्टार झाली. आता रानूनंतर आणखी एका महिलेचा व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. होय, कुण्या गावखेड्यातील या महिलेच्या आवाजाने नेटक-यांना वेड लावले आहे.
व्हिडीओत गाणारी ही महिला कोण, कुठली हे कळायला मार्ग नाही. पण तिचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुबोध घिलडीयाल नावाच्या एका युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 

‘या सुरेल आवाजाच्या महिलेला कोणी शोधू शकेल का? असे हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे. सुबोध यांच्या या ट्विटर पोस्टवर नेटक-यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आवाजाचे  कौतुक केले आहे. तिच्यातील गुणांना वाव मिळायला हवा, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

या व्हिडीओतील महिला महिला ‘ताज महल’ सिनेमातील ‘जो वादा किया वो’ हे गाणे गाताना दिसत आहे.  लता मंगेशकर यांनी हे गीत गायलेले आहे. व्हिडीओतील या महिलेचा आवाज इतका सुरेल आहे की तिला गाताना ऐकल्यावर सर्वांना पुन्हा एकदा रानू मंडलची आठवण झाली.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: new ranu mondal viral video on twitter women singing jo wada kiya woh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.