दिशा पटानीने १३ जूनला वाढदिवस साजर केला. याच दिवशी तिच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. 

दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत एका मांजरीच्या पिल्लूचा गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, कुटुंबात स्वागत आहे किटी. दिशाचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. या पोस्टपूर्वी दिशाने वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत.


टायगर श्रॉफने एक व्हिडिओ शेअर करून दिशाला बर्थ डे विश केले होते. या व्हिडिओत टायगर व दिशा डान्सची रिहर्सल करत होते. या व्हिडिओसोबत त्याने म्हटले, हॅप्पी बर्थ डे डी. त्यानंतर संध्याकाळी दिशा व टायगरने बर्थ डे सेलिब्रेट केला.


दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती मलंग सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर व अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिशा नुकतीच सलमान खान अभिनीत भारत चित्रपटात झळकली. तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आहे. 


दिशा पटानी बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. या फोटोंना खूप पसंती मिळते. कधी कधी या फोटोंमुळेच तिला ट्रोलिंगला सामोरे जावं लागतं.


Web Title: new member in Disha Patni's home, she shared photo on Instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.