सुश्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल झाला ट्रोल, मजेशीर आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 03:40 PM2021-06-24T15:40:03+5:302021-06-24T15:40:33+5:30

सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल बॉलिवूडचे एक चर्चित कपल आहे. पण तूर्तास काय तर रोहमन आणि सुश्मिता यांच्यावरून सोशल मीडिया युजर्समध्ये जुंपली आहे. कारणही मजेशीर आहे.

Netizens Troll Sushmita Sen's Boyfriend, Rohman Shawl For Carrying Her Bag, Ask Him To Be A Man |  सुश्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल झाला ट्रोल, मजेशीर आहे कारण

 सुश्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल झाला ट्रोल, मजेशीर आहे कारण

Next
ठळक मुद्देसुश्मिता व रोहमन दीर्घकाळापासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दोघांनीही आपली प्रेमकहाणी कधीच जगापासून लपवली नाही.

सुश्मिता सेन ( Sushmita Sen) व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल  (Rohman Shawl) बॉलिवूडचे एक चर्चित कपल आहे. बाहेर दिसले रे दिसले की, पापाराझींचे कॅमेरे त्यांच्यामागे पडतात. दोघांची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री अनेकदा चर्चेत असते. पण तूर्तास काय तर रोहमन आणि सुश्मिता यांच्यावरून सोशल मीडिया युजर्समध्ये जुंपली आहे. होय,याचे कारणही मजेशीर आहे.
तर सुश्मिता व रोहमन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात सुश्मिता मुलगी अलिशासोबत दिसतेय तर रोहमन शॉल त्यांच्या किंचित मागे उभा आहे. आता या फोटोत युजर्सला असे काय दिसले तर, रोहमनच्या हातातील पर्स. होय, रोहमनच्या हातात सुश्मिताची पर्स आहे. तो सुश्मिताची पर्स कॅरी करतोय. (Netizens Troll Sushmita Sen's Boyfriend, Rohman Shawl For Carrying Her Bag)

नेमक्या याच एका कारणावरून सोशल मीडिया युजर्स एकमेकांसोबत भिडलेत. होय, काहींनी यावरून  रोहमन व सुश्मिताला ट्रोल करायला सुरूवात केली. अशात अनेक जण रोहमनचा बचाव करत मैदानात उतरले.

हा नेहमीच तिची बॅग कॅरी करतो. एखादवेळी समजू शकतो. पण दरवेळी? मर्द बन, असे लिहित एका युजरने रोहमनला ट्रोल करण्याच प्रयत्न केला. अन्य अनेक युजर्सनीही रोहमनला याच पद्धतीने ट्रोल केले. हे पाहून काही युजर्स रोहमनच्या बाजुने मैदानात उतरले. ‘आपकी मर्दानगी इतनी कमजोर है की, एक मर्द के हाथ में महिला का पर्स देखकर तबाह हो गया?’, अशा शब्दांत एका युजरने रोहमनला ट्रोल करणाºयांचा समाचार घेतला.  
सुश्मिता व रोहमन दीर्घकाळापासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दोघांनीही आपली प्रेमकहाणी कधीच जगापासून लपवली नाही. सोशल मीडियावर दोघेही परस्परांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात. सुश्मिताच्या दोन्ही मुली रिनी व अलिशा यांच्यासोबतही रोहमनची चांगली बॉन्डिंग बाहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Netizens Troll Sushmita Sen's Boyfriend, Rohman Shawl For Carrying Her Bag, Ask Him To Be A Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app