Netizens troll Ranu Mondal for her makeup- See inside | पहचान कौन? रानू मंडलचा नवा लूक पाहून व्हाल थक्क!!

पहचान कौन? रानू मंडलचा नवा लूक पाहून व्हाल थक्क!!

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून रानू तिच्या अ‍ॅटिट्यूडमुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत.  लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गीत गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू अनेकांच्या नजरेत भरली, तिच्या आवाजाने हिमेश रेशमिया सारखा दिग्गज गायक व संगीतकारही प्रभावित झाला. त्याने आपल्या सिनेमात  रानूला पार्श्वगायनाची संधी दिली. एकापाठोपाठ एक अशी तीन गाणी त्याने रानूकडून रेकॉर्ड करून घेतली. यानंतर तर रानू भलतीच लोकप्रिय झाली. सध्या याच रानूचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. होय, रानूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रानूने हेवी मेकअप केला आहे.  

हे फोटो एका इव्हेंटमधील असल्याचे म्हटले जात आहे. या इव्हेंटमध्ये रानू डिझाईनर कपडे, हेवी मेकअपमध्ये दिसली. या इव्हेंटचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

यात रानू रॅम्प वॉक करताना दिसतेय. पीच कलरचा लहंगा घातलेली रानू रॅम्प वॉक करतेय. बॅकग्राऊंडमध्ये फॅशन चित्रपटातील ‘जलवा’ हे गाणे वाजतेय.

रानूने आत्मविश्वासाने हा लूक कॅरी केला. पण अनेकांना तिचा हा नवा लूक रूचला नाही. मग काय लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. सध्या रानूच्या या नव्या लूकवरचे मीम्स व्हायरल होत आहेत. यात युजर्स रानूची खिल्ली उडवताना दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून रानू तिच्या अ‍ॅटिट्यूडमुळे चर्चेत आहे. चाहत्यांना आणि मीडियाला अ‍ॅटिट्यूड दाखवणारी रानूचा एक  व्हिडीओ नुकताच चर्चेचा विषय बनला होता. त्याआधी एका चाहतीला फटकारतानाचा तिचा व्हिडीओही असाच चर्चेत आला होता.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Netizens troll Ranu Mondal for her makeup- See inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.