neil nitin mukesh family tests covid 19 positive actor shares health update | प्लीज माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा...! 2 वर्षांच्या मुलीसह नील नितीन मुकेशच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना

प्लीज माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा...! 2 वर्षांच्या मुलीसह नील नितीन मुकेशच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना

ठळक मुद्देकालच 17 एप्रिलला नील नितीन मुकेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या कुटुंबातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

बॉलिवूडमध्ये कोरोनाने सगळ्यांनाच धडकी भरवली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. आता अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) याच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. नील स्वत:, त्याचे बाबा, पत्नी, भाऊ शिवाय नीलच्या दोन वर्षाच्या चिमुकलीलाही कोरोना झाला आहे. (Neil Nitin Mukesh family tests covid 19 positive )

माझ्या कुटुंबात फक्त आईच ठिक आहे. उर्वरित आम्ही सगळे जण कोरोना पॉझिटीव्ह आहोत. माझी दोन वर्षाची मुलगी नुर्वी ही सुद्धा पॉझिटीव्ह आहे. अशात माझी स्थिती तुम्ही समजू शकता़ दोन दिवसांपूर्वी नूर्वीला ताप आला होता. त्यामुळे आम्ही तिची व सर्वांची कोरोना टेस्ट केली. मी, रूक्मिणी, पापा, भाऊ नमन, नूर्वी सगळेच पॉझिटीव्ह आलोत. आई मात्र ठीक आहे, असे नीलने ‘स्पॉटबॉय’ला सांगितले.

कालच 17 एप्रिलला नील नितीन मुकेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या कुटुंबातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.   
‘प्रत्येक व्यक्तीला व्हायरसची लागण वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. आतापर्यंत आमच्यापैकी कोणालाच गंभीर स्वरुपाची लक्षण आढळलेली नाहीत. पण काळजी वाटतेय. बाबांचे वय 70 वर्षांचे आहे. नूर्वी केवळ 2 वर्षांची आहे. त्यांची काळजी वाटतेय.  त्यामुळे सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करा,’ असे नील म्हणाला. कृपा करून  गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करा.   शक्य असेल तर घरी राहा, असे आवाहनही त्याने केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neil nitin mukesh family tests covid 19 positive actor shares health update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.