ठळक मुद्दे2017 मध्ये नीना यांनी एक ट्वीट करून काम मागितले होते.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या परखड व बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात. 60 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणा-या नीनांचा ‘पंगा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात कंगना राणौत लीड भूमिकेत आहे. सध्या नीना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. यादरम्यान दिल्लीतील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्या आपल्या कमबॅकवर बोलल्या.


काही दिवसांपूर्वी नीना यांनी सोशल मीडियावर काम मागणारी पोस्ट लिहिली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना नीनांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘मला कुणाकडून पैसे मागण्याची लाज वाटते. काम मागण्याची नाही. मी सुरुवातीला मुंबईत आले होते, तेव्हा माझा बॉयफ्रेन्ड माझ्यासोबत होता. मी पृथ्वी थिएटरमध्ये किचनमध्ये काम करायची. त्या मोबदल्यात मला रात्रीचे जेवण फुकट मिळायचे. त्याकाळात पैसे नव्हते. माझा बॉयफ्रेन्ड माझ्याकडून पैसे घेऊन सिगारेट फुंकायचा. पण माझ्या कामाची त्याला लाज वाटायची. काम कुठलेही असो ते करताना आणि ते मागताना लाज वाटायला नको. लाज वाटायला हवी तर ती पैसे मागताना वाटायला हवी, ’ असे नीनांनी यावेळी सांगितले.


2017 मध्ये नीना यांनी एक ट्वीट करून काम मागितले होते. त्यांच्या या ट्वीटनंतर त्यांना एक-दोन नाही तर चार चित्रपट आॅफर झाले होते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बधाई हो’ या चित्रपटात त्यांचा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. 


या वयातही नीना प्रचंड बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या  बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neena gupta reveals her boyfriend story and struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.