Neena gupta birthday actress affair with vivian richards | Birthday Special: सिनेमांपेक्षा जास्त अफेरमुळे चर्चेत राहिल्या नीना गुप्ता , लग्न न करताच आई होण्याचा घेतला होता निर्णय

Birthday Special: सिनेमांपेक्षा जास्त अफेरमुळे चर्चेत राहिल्या नीना गुप्ता , लग्न न करताच आई होण्याचा घेतला होता निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आज आपला 61 वा  वाढदिवस साजरा करतायेत. नीना गुप्ता या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी  गंभीरपासून ते विनोदी भूमिकांपर्यंत सर्व भूमिका साकारल्या आहेत. 4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. रिपोर्टनुसार नीना गुप्ता यांचे पहिले अफेअर अलोक नाथ यांच्यासोबत होते, मात्र हे कमी वेळासाठी होते. 


वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला . 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियनने. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते.  विवियन नीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण त्याला आपले लग्नही तोडायचे नव्हते. त्यामुळे त्याने नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.


1989 मध्ये नीना यांनी मुलीला जन्म दिला. कुमारी माता बनण्याच्या नीनांच्या या निर्णयावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. पण नीना डगमगल्या नाहीत. नीनाने सिंगल पॅरेंट बनून मसाबाचे संगोपन केले. कारण मसाबाच्या जन्मानंतर विवियन व नीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. हळूहळू दोघांच्या भेटी कमी झाल्यात. त्यांच्यात दुरावा आला. पुढे दोघांनीही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अर्थात विवियनने नीनांसोबत संबंध तोडले तरी पित्याचे कर्तव्य मात्र निभवले. विवियनकडून एकार्थाने धोका मिळाल्यानंतर नीना यांनी एकटीच्या बळावर मसाबाला घडवले. आज मसाबा बॉलिवूडची नामवंत फॅशन डिझाईनर म्हणून ओळखली जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neena gupta birthday actress affair with vivian richards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.