मलायका अरोरा आणि अरबाज खान कित्येक वर्षे आयडियल कपलसारखे राहिल्यानंतर २०१६ मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त ऐकून चाहते हैराण झाले होते. आता तर ते दोघे सगळं विसरून पुढील आयुष्य जगत आहेत. मात्र घटस्फोट झाल्यानंतरही मलायकाच्या कुटुंबात अरबाजचे नातेसंबंध तसेच कायम आहेत. ही माहीत खुद्द मलायकानंच एका मुलाखतीत दिली.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सांगितलं की, अरबाज आणि मी भलेही वेगळं झालो आहोत. पण माझ्या कुटुंबात त्याचं नातं आजही तसंच आहे. नाती एका रात्रीत बनत नाहीत. नाती बनायला वेळ लागतो. नाती खूप खास आणि खासगी असतात.


मलायका पुढे म्हणाली की अरबाज सोबत अमृताचे नाते आजही तितकंच स्ट्राँग आहे आणि हे नातं असंच कायम राहील. माझे पालक नेहमी सांगतात की माझ्या ब्रदर इन लॉ ने देखील चांगले रिलेशन मेंटेन केलं आहे.


एका मुलाखतीत अरबाजने मलायकाच्या कुटुंबासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं की, माझं मलायकाच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहे. आम्ही एकत्र प्रेमानं एका छताखाली राहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमची मुलं आमच्यावर निर्भर आहेत. ते मोठे झाले की सर्वकाही ठीक होईल.


मलायका अरोराअरबाज खानने १९९८ साली प्रेमविवाह केला होता. २००२ साली मलायकाने अरहानला जन्म दिला. २०१६ साली त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ११ मे, २०१७ साली ते विभक्त झाले.

आता अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतोय. तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nd her family shares with Arbaaz Khan even after their divorce Share this on: FacebookTwitterPintrest COMMENTS (1)SORT: CLOSECOMMENTS userthumb Add your comment here Count: 3000 loader Malaika Arora opens up the bond her family shares with Arbaaz Khan e

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.