Nawazuddin Siddiqui’s younger sister dies after long battle with breast cancer | नवाजुद्दीन सिद्दीकीवर कोसळला दुःखाचा डोंगर, छोट्या बहिणीने घेतला जगाचा निरोप
नवाजुद्दीन सिद्दीकीवर कोसळला दुःखाचा डोंगर, छोट्या बहिणीने घेतला जगाचा निरोप

बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवाजुद्दीनची बहिण सायमा तमशी सिद्दकीचं निधन झालं आहे. सायमा फक्त २६ वर्षांची होती. शनिवारी सायमाचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. बहिणीच्या निधनाची बातमी नवाजुद्दीनचा लहान भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीने दिली आहे. 

अयाजुद्दीनच्या सांगण्यानुसार, बहिणीचं निधन झालं तेव्हा अभिनेता नवाजुद्दीन कामानिमित्त अमेरिकेत होता. सायमाला ब्रेस्ट कॅन्सर होता. वयाच्या १८ व्या वर्षी सायमाला आजाराबद्दल समजलं होतं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. नवाजुद्दीनने गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्या बहिणीला कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. 
नवाजुद्दीनच्या बहिणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशमधील बुढाणा येथे रविवारी सकाळी ८ वाजता होणार आहे. जिथे त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित आहे. यावेळी नवाजुद्दीनचे दोन भाऊ दिग्दर्शक शमास नवाब सिद्दीकी आणि वकिल हाजी अलमाजुद्दीन सिद्दीकी देखील पोहोचले आहेत. 

Web Title: Nawazuddin Siddiqui’s younger sister dies after long battle with breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.