nawazuddin siddiqui saif ali khan sacred games 2 promo kalki koechlin ranvir shorey | WATCH : ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज, कल्की कोच्लिन व रणवीर शौरीची एन्ट्री!!

WATCH : ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज, कल्की कोच्लिन व रणवीर शौरीची एन्ट्री!!

ठळक मुद्देअनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या  ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्सची फर्स्ट ओरिजनल इंडियन सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. या पहिली सीरिज संपत नाही, तोच प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले होते. केवळ इतकेच नाही तर आम्हाला ‘सेक्रेड गेम्स 2’ पाहिजे, अशी मागणी प्रेक्षकांनी लावून धरली होती. याच प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे. ती म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो. होय, ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित झालाय.
‘सेक्रेड गेम्स 2’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झालीय. सोमवारी नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज करत, चाहत्यांना सरप्राईज दिले. हा प्रोमो येताच व्हायरल झाला.
‘सेक्रेड गेम्स 2’च्या या नव्या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी व कल्की कोच्लिन दिसतात.  अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये किती एपिसोड असणार, ते कधी टेलिकास्ट होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
२०१८ मध्ये या सीरिजचे पहिले सीझन आले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या  ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये   गणेश गायतोंडेचा मरताना दाखवले होते. पण  ‘सेक्रेड गेम्स 2’ तो परतताना दिसतोय. साहजिकचं चाहते खूश आहेत. गणेश गायतोंडे ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीनने साकारली होती. सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत होता. आता  ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये गणेश गायतोंडे कसा परततो, हे सगळे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nawazuddin siddiqui saif ali khan sacred games 2 promo kalki koechlin ranvir shorey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.