nawazuddin siddiqui niece alleges sexual harassment by her uncle files complaint in delhi | चाचाने मेरे साथ गंदा काम...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीचे गंभीर आरोप

चाचाने मेरे साथ गंदा काम...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीचे गंभीर आरोप

ठळक मुद्दे22 वर्षांच्या पीडितेने दिल्लीच्या जामिया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडिता 9 वर्षांची असतानाचे हे प्रकरण आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला काहीच दिवसांपूर्वी पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता नवाजुद्दीनचे कुटुंब पुन्हा एका गंभीर प्रकरणात अडकले आहे. होय, नवाजुद्दीनच्या पुतणीने नवाजुद्दीनच्या धाकट्या भावाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात बडे पापांनी (नवाजुद्दीन) कुठलीही मदत न केल्याचेही तिने म्हटले आहे.
22 वर्षांच्या पीडितेने दिल्लीच्या जामिया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडिता 9 वर्षांची असतानाचे हे प्रकरण आहे.

 पीडितेने सांगितले की, ही घटना अनेक वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझे वय 9 वर्षे होते. मी दोनच वर्षांची असताना माझ्या आईवडिलांचा ‘तलाक’ झाला होता. वडिलांनी दुसरे लग्न केले होते आणि मी माझ्या सावत्र आईसोबत राहत होती. तेव्हा मला काहीही कळत नव्हते. माझे लैंगिक शोषण होत होते. मी माझ्या वडिलांना आणि आजीला सांगितले. पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. समज आल्यानंतर मला माझ्यासोबत वाईट घडल्याचे कळले. माझ्या काकानेच माझ्यासोबत वाईट केले होते. त्याचा प्रत्येक स्पर्श घाणेरडा होता, 2017 पूर्वी मी माझ्या बडे पापांना (नवाजुद्दील) चाचांच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितले. मी डिस्टर्ब असल्याचेही त्यांना सांगितले. पण असे काहीही नाही़ ते तुझे चाचा आहेत. ते तुझ्यासोबत असे काही करूच शकत नाहीत, असे सांगून त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता. त्यांनी मला सोबत करण्याऐवजी, मला समजून घेण्याऐवजी मलाच शांत बसवले.

नवाजुद्दीनच्या पुतणीने आणखीही गंभीर आरोप केले. तिने सांगितले, ‘दोन वर्षांआधी मी प्रेमविवाह केला. आमचे कोर्ट मॅरेज झाले. पण माझ्या कुटुंबाने माझ्या पतीविरोधात अपरहणाचा खोटा गुन्हा दाखल केला. बडे पापा (नवाज) मध्यस्थी करू शकले असते. ते हस्तक्षेप करू शकले असते. पण त्यांनी काहीही केले नाही.
आजही प्रत्येक सहा महिन्याला माझे वडील गुन्हा दाखल करतात. आता मात्र मी तक्रार दाखल केली आहे. यानंतर ते असे काही वागणार नाहीत, अशी आशा करते.’ मला माझ्या पतीचे खूप सहकार्य केले, असेही तिने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nawazuddin siddiqui niece alleges sexual harassment by her uncle files complaint in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.