ठळक मुद्देनताशाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

यावर्षी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचला प्रपोज केले.  नताशाने होकार दिला आणि लगेच साखरपुडाही झाला. तेव्हापासून  नताशा चर्चेत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजण आपआपल्या घरात बंद आहेत. हार्दिक व नताशा हे दोघेही याला अपवाद नाहीत. सध्या हे कपल एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवतेय. यादरम्यानचा एक रोमॅन्टिक फोटो नताशाने शेअर केला आहे.

#stayhomestaysafe #quarantine असे हा फोटो शेअर करताना नताशाने लिहिले आहे. हो फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला असून तूर्तास त्यावर चाहत्यांच्या कमेंट्स वर्षाव होतोय.   फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोत हार्दिक व नताशासोबत त्यांचा पाळीव कुत्राही दिसतोय.


 
  नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नताशासोबतचा फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती. ‘माझ्या फायरवर्कसोबत नवीन वषार्ची सुरुवात’, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला होता.

नताशाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने  सत्याग्रह  चित्रपटात आयटम साँगवर नृत्य केले आहे. त्यानंतर ती 'डिजे वाले या गाण्यात देखील दिसली होती.  फुकरे  चित्रपटातील ओ मेरी मेहबुबा  या गाण्यावरही ती थिरकताना दिसली होती. छोट्या पडद्यावरील  नच बलिये या शोमध्ये देखील ती झळकली होती.
 

 

Web Title: natasa stankovic and cricketer hardik pandya gets romantic during quarantine lockdown corona-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.