ठळक मुद्देउदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिस एका अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजोच्या प्रेमात वेडी झाली होती.

इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी बॉलिवूडची हॉटी नर्गिस फाखरी सध्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. नर्गिसचा ‘रॉकस्टार’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला. या चित्रपटातील तिची  व रणबीर कपूरची जोडीही हिट झाली. मात्र नर्गिस बॉलिवूडमध्ये फार चमक दाखवू शकली नाही. चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच ती चर्चेत राहिली. सध्या नर्गिस जस्टिन संटोसला डेट करतेय.

नर्गिस व जस्टिनचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द जस्टिनने हे फोटो शेअर केले आहेत. ‘ही परफेक्ट महिला बघा. मी इतका नशीबवान कसा? सुंदर असण्यासोबतच ती मजेदार जोक्स ऐकवते, असे मी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल?’, अशा कॅप्शनसह जस्टिनने नर्गिससोबतचे हे फोटो शेअर केले आहेत.

यात जस्टिन व नर्गिस दोघेही एका क्रूजवर आहेत. नर्गिसचा बॉयफ्रेन्ड जस्टिन हा एक शेफ आहे. नर्गिस कॅलिफोर्नियाला राहते तर जस्टिन न्यूयॉर्कचा राहणारा आहे. असे असले तरी एकमेकांना भेटायला ते वेळ काढतातच.

जस्टिनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नर्गिस नेहमी सोशल मीडियावर करत असते. सध्या हे कपल व्हॅकेशनवर आहे. याच दरम्यान जस्टिन नर्गिसला शूटिंग रेंजवर गनशूट शिकवतो आहे. अलीकडेच नर्गिसने व्हॅकेशन दरम्यानचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. ज्यात ती जस्टिनसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसली होती.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, नर्गिस ‘तोरबाज’मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत संजय दत्त, राजू चड्ढा, पुनीत सिंग आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. नर्गिस शेवटची ‘अमावस’मध्ये दिसली होती, हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.

 उदय चोप्रासोबतसोबत होती नात्यात

एकेकाळी नर्गिस व उदय चोप्रासोबत नर्गिस रिलेशनशिपमध्ये होती, असे मानले जाते. त्यावेळी दोघांच्याही अफेअरच्या चर्चा जोरात होत्या़अर्थात नर्गिसने यास कधीही दुजोरा दिला नाही. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते.  यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले होते. जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती.

सेक्ससाठी नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट!

नर्गिस फाखरीने शेअर केले स्टायलिश फोटो, पाहा तिच्या ग्लॅमरस अदा!

या अमेरिकन दिग्दर्शकासोबतही रंगल्या होत्या रिलेशनशिपच्या चर्चा

उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिस एका अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजोच्या प्रेमात वेडी झाली होती.
 मॅटने नर्गिससोबतचा फोटो शेअर करत तो व नर्गिस रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले होते. यानंतरही दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत नर्गिस मॅटला किस करताना दिसली होती.  
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nargis fakhri romantic picture with boyfriend justin santos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.