नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 12:26 PM2020-11-19T12:26:42+5:302020-11-19T12:29:57+5:30

जाणून घ्या काय आहे प्रकरण

nagraj manjule and Amitabh Bachchan’s Jhund Isn’t Releasing Anytime Soon As Supreme Court Refuses To Give A Greenlight | नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.

सैराट, फँड्रीसारखे तगडे मराठी सिनेमे दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळेने हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’ या हिंदी सिनेमाची घोषणा झाली.  अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची या चित्रपटात वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. लॉकडाऊन उठला, पण यादरम्यान ‘झुंड’ कायद्याच्या कचाट्यात अडकला आणि प्रदर्शनावर बंदी लादली गेली. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने  या सिनेमावरच्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास नकार दिला आहे. यापूर्वी तेलंगणा उच्च न्यायालयानेही ‘झुंड’च्या प्रदर्शनावरील बंदी कायम ठेवत, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
‘झुंड’च्या मेकर्सविरोधात हैदराबादेतील चित्रपट निर्मात नंदी चिन्नी कुमार यांनी  याचिका दाखल केली आहे. ‘झुंड’चित्रपट  कॉपीराइटचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बुधवारी याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ‘झुंड’च्या प्रदर्शनावरील बंदी हटवण्यास नकार दिला.  

 ‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी  गरिब वस्तीत राहणा-या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याचीच ही कथा. पण आता ही कथा अखिलेश पॉल या नावामुळे वादात सापडली आहे. अखिलेश पॉल हा नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारा व्यसनी मुलगा. त्याला फुटबॉलची आवड असते. फुटबॉलची हीच आवड त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. विजय बारसे यांनी त्याला तयार केले. आज अखिलेश स्लम फुटबॉल खेळतो.

काय आहे प्रकरण

 नंदी कुमार यांच्या दाव्यानुसार, अखिलेश पॉल यांच्याशिवाय विजय बारसे यांचे बायोपिक पूर्णच होऊ शकत नाही.  2017 मध्ये नंदी कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ फुटबॉलपटू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हक्क विकत घेतले. त्यानंतर नंदी कुमार यांनी त्याच्या आयुष्यावरच्या चित्रपटाची योजना आखली. 11 जून 2018 रोजी नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या नोंदही केली. परंतु, याचदरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क विकत घेतले. या चित्रपटात विजय बारसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणून कुमार यांनी नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. ‘झुंड’चे चित्रपटगृहातील व ओटीटीवरचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी नंदी कुमार यांनी केली आहे.

नागराज मंजुळेसाठी नाही तर या अभिनेत्यामुळे 'झुंड' सिनेमाला दिला अमिताभ यांनी होकार !

Web Title: nagraj manjule and Amitabh Bachchan’s Jhund Isn’t Releasing Anytime Soon As Supreme Court Refuses To Give A Greenlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.