गेल्या ६ वर्षांत इतकी बदलली 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी, बेबोच्या गाण्यावर दिसली थिरकताना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:48 PM2021-05-11T14:48:41+5:302021-05-11T14:50:10+5:30

हर्षाली मल्होत्राचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Munni of 'Bajrangi Bhaijaan' has changed so much in the last 6 years, appearing on Bebo's song | गेल्या ६ वर्षांत इतकी बदलली 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी, बेबोच्या गाण्यावर दिसली थिरकताना

गेल्या ६ वर्षांत इतकी बदलली 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी, बेबोच्या गाण्यावर दिसली थिरकताना

Next

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजेच बालकलाकार हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह झाली आहे. ती बऱ्याचदा तिचे डान्स व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ती चाहत्यांसोबत संपर्कात असते. नुकतेच हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती करीना कपूर खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.


हर्षाली मल्होत्राने आपला डान्स व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की,तुझे भर लू अपनी आँखो में. हर्षाली करीना कपूरचे चमेली चित्रपटातील सजना वे सजना गाण्यातील एका कडव्यावर थिरकत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

या डान्स व्हिडीओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, मुन्नी तर इतकी मोठी झाली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, देशातील सर्वात सुंदर मुलगी.


हर्षाली मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर २०१५ साली रिलीज झालेला चित्रपट बजरंगी भाईजानमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात हर्षालीने मुन्नीची भूमिका साकारली होती. यातील तिच्या अभिनयाचे सगळीकडे खूप कौतुक झाले होते.

या चित्रपटानंतर हर्षाली कोणत्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसली नाही. त्यामुळे तिचे चाहते आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. 
  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Munni of 'Bajrangi Bhaijaan' has changed so much in the last 6 years, appearing on Bebo's song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app