ठळक मुद्देसुश्मितासोबत ब्रेकअप का झाले? असा थेट प्रश्न मुदस्सरला विचारला गेला. यावरही त्याने उत्तर दिले.

अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या रोहमन शॉल याला डेट करतेय. पण त्याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले.  इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, दिग्दर्शक मुदस्सर अजीज याच्यासोबतही सुश्मिता रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे सुश्मिताला रोहमन मिळाला आणि मुदस्सरला हुमा.


होय, मुदस्सर अजीज सध्या अभिनेत्री हुमा कुरेशीला डेट करत असल्याची चर्चा आहे. एकेकाळी हुमाला डेट करत असलेला मुदस्सर सुश्मिताच्या प्रेमात वेडा झाला होता. पण त्याचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. पण या नात्याचा अंत का झाला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. मात्र आता दीर्घकाळानंतर स्वत: मुदस्सरने याचा खुलासा केला आहे.

( मुदस्सर अजीज- हुमा कुरेशी)

डीएनएशी बोलताना मुदस्सरने या ब्रेकअपबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले की, ‘ माझे व सुश्मिताचे नाते तुटले, असे लोक मला म्हणायचे. पण मी यावर काहीही प्रतिक्रिया द्यायचो नाही. पण हो, या बातमीने माझ्या पालकांना बराच त्रास झाला. मी एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. अशा कुटुंबातील पालक किती संवेदशनशील असतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. वृत्तपत्रात आपल्या मुलाच्या रिलेशनशिपच्या बातम्या ऐकून माझे आई-वडिल चिंतीत होते. यामुळे आई-वडिलांसोबतचे माझे संबंध बिघडू लागले होते.’

(सुश्मिता सेन- रोहमन शॉल )

सुश्मितासोबत ब्रेकअप का झाले? असा थेट प्रश्न मुदस्सरला विचारला गेला. यावरही त्याने उत्तर दिले. ‘सुश्मिता एक चांगली व्यक्ति आहे. ती तिच्या अटींवर आयुष्य जगते. प्रत्येकजण असे करू शकत नाही. त्यामुळेच मला तिच्याबद्दल आदर आहे. एखाद्या व्यक्तिला बाहेरून ओळखत असताना तुम्ही तिच्याबद्दल काहीमतं बनवता. पण हीच व्यक्ती जवळ आली की, ही मतं गळून पडतात. माझ्यासोबतही असेच काही झाले. पण सुश्मिताबद्दल माझ्या मनात कुठलाही राग नाही,’ असे मुदस्सरने सांगितले.


Web Title: mudassar aziz reveals after break up with sushmita sen he faced tough time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.