Mrinal Thakur will be seen this role in 'Bahubali: Before the Beginning' web series | 'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' वेबसीरिजमध्ये मृणाल ठाकूर साकारणार ही भूमिका

'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' वेबसीरिजमध्ये मृणाल ठाकूर साकारणार ही भूमिका

ठळक मुद्देराजमाता शिवगामी यांची कथा वेबसीरिजमध्ये मृणाल ठाकूर साकारणार शिवगामीची भूमिका

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या दोन्ही चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता यावर आधारीत वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा दाखवण्यात येणार आहे. 'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' असे या सीरिजचे नाव असून या प्रिक्वल सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दोन्ही चित्रपटात अभिनेत्री रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. मात्र वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर शिवगामीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका करण्यासाठी मृणाल खूप उत्सुक असल्याचे तिने एका वेबसाईटला सांगितले व पुढे म्हणाली की, मला शिवगामीची भूमिका करायची आहे कारण ती धाडसी महिला आहे. मला माहित नाही की खऱ्या आयुष्यात मी तिच्यासारखी कधी बनेन. पण, मला अशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. मला ही भूमिका करायला मिळतेय, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.

तिच्यासोबत राहुल बोस, अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही भूमिका आहेत. आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सीरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यातून उलगडत जाणार आहे. एकूण ९ भागांची ही वेबसिरिज असणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mrinal Thakur will be seen this role in 'Bahubali: Before the Beginning' web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.