ठळक मुद्देलवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

टीव्ही इंडस्ट्रीची ‘नागिन’ मौनी रॉय पुन्हा व्हॅकेशनवर गेलीय. आता व्हॅकेशन म्हटल्यावर मौनीचे फोटो येणारच आणि ते व्हायरल होणारच. सध्या तिचे रेड बिकिनीतील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
रेड बिकिनी घालून मौनी समुद्र किना-यावर मस्ती करताना दिसतेय. सोशल मीडियावर मौनीने अनेक फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या पुन्हा प्रेमात पडले नाहीत तर नवल. 

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणारी मौनी रॉय तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते. 
 


 मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. नुकताच तिचा ‘मेड इन चायना’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.


‘देवो के देव- महादेव’ मालिकेत मौनीने सतीची भूमिका केली होती. या मालिकेने मौनीला वेगळी ओळख दिली. सतीच्या नावाने ती घराघरात प्रचलित झाली. पुढे बॉलिवूडकडे तिने मोर्चा वळवला. यासाठी अगदी  लिप आणि जॉची सर्जरीही केली. अर्थात तिने ही गोष्ट कधीही स्वीकारली नाही.


पण तिचे आधीचे फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो. लूकमधील बदलामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. पण मौनीने कधीच या ट्रोलिंगची पर्वा केली नाही. 

Web Title: mouni roys bikini pics going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.