ठळक मुद्देतिच्या परफॉर्मन्सच्या काही वेळ आधी तिने मोबाईलवरील सील काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर तेथील सिक्युरीटी गार्डने तिला असे करण्यास मनाई केली. त्यावर मौनी भडकली आणि तिने परफॉर्मन्स न करण्याची धमकी दिली.

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे नुकतेच झालेले लग्न मीडियात चांगलेच गाजले. त्यांच्या लग्नाला जगभरातील अनेक श्रीमंत लोकांनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांच्या लग्नात दमदार परफॉर्मन्स दिले. पण आता हे लग्न एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. 

अंबानी यांनी लग्नात प्रचंड सुरक्षाव्यवस्था ठेवली होती. या लग्नात येणारे प्रत्येक गेस्ट हे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तसेच या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत याची देखील काळजी घेण्यात आली होती आणि त्याचमुळे तिथे येणाऱ्या सगळ्यांचेच मोबाईल सील करण्यात आले होते. लग्नाला आलेल्या सगळ्याच लोकांनी देखील अंबानी कुटंबाला याबाबत सहकार्य केले. पण या सगळ्यात अभिनेत्री मौनी रॉय अपवाद ठरली असल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. 

बॉलिवूड शादी डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, मौनी लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिला मोबाईल सील करण्यासाठी विनंती करण्यात आली. पण या गोष्टीशी ती सहमत नव्हती. पण तिला अनेक वेळा समजवल्यानंतर ती या गोष्टीसाठी तयार झाली. पण तिच्या परफॉर्मन्सच्या काही वेळ आधी तिने मोबाईलवरील सील काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर तेथील सिक्युरीटी गार्डने तिला असे करण्यास मनाई केली. त्यावर मौनी भडकली आणि तिने परफॉर्मन्स न करण्याची धमकी दिली. पण या परफॉर्मन्ससाठी तिला आधीच काही रक्कम दिली गेली असल्याने तिला परफॉर्मन्स करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी ३० जूनला झाला होता. श्लोका मेहता ही आकाशची बालमैत्रीण असून त्या दोघांचे शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झाले आहे. श्लोका ही रसेल मेहता या डायमंड उद्योजकाची मुलगी आहे. या दोघांच्या साखरपुड्याआधी मेहंदी, प्री- एंजेगमेंट पार्टी पार पडली होती. यानंतर अंबानींच्या एंटिलियामध्ये अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात त्यांचा साखरपुडा झाला होता.


Web Title: Mouni Roy Threatened To Cancel Her Performance At Akash Ambani And Shloka Mehta's Wedding
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.