टेलिव्हिजन जगतात आपलं नाव कमाविल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तिची सेक्सी कंबर दिसते आहे.

मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ती विंडोमध्ये उभी बाहेर पाहताना दिसते आहे. या फोटोत तिने लो वेस्ट जिन्स व क्रॉप टॉप परिधान केला आहे. या फोटोत तिच्या सेक्सी कंबरेवर सगळ्यांचं लक्ष जात आहे आणि तिच्या या फोटोंवर खूप कमेंट्स येताना पहायला मिळत आहेत.


मौनीच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले असून त्यांनी सेक्सी कंबर, वॉव क्या फिगर है सारख्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत.


मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. असं सांगितलं जातंय की, या चित्रपटात मौनी निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. 


मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती. त्यासोबतच ती रिएलिटी शो 'जरा नच के दिखा'ची देखील विजेती आहे.

मौनी रॉय त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने 'देवो के देव- महादेव' मालिकेत सतीची भूमिका केली होती. सतीच्या नावानं ती घराघरात प्रचलित झाली. त्यानंतर अचानक ती सुंदर दिसू लागले की लोक तिला पाहून चकीत झाले. 


चित्रपटांबद्दल सांगायचं तर मौनीनं 'गोल्ड' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर ती 'केजीएफ', 'मेड इन चाइना'आणि 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये दिसली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mouni Roy shared bold photos on Instagram, She flaunts her toned figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.