बोले चूडिया सिनेमातून मेकर्सनी मौनीला दिला डच्चू , कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:37 PM2019-06-01T16:37:41+5:302019-06-01T16:46:39+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती जॉन अब्राहमच्या 'रॉ' सिनेमात दिसली होती.

Mouni roy no longer a part of nawazuddin bole chudiyan | बोले चूडिया सिनेमातून मेकर्सनी मौनीला दिला डच्चू , कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

बोले चूडिया सिनेमातून मेकर्सनी मौनीला दिला डच्चू , कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देबोले चूडिया सिनेमातून मौनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहेबोले चूडियाची निर्मिती किरण भाटिया आणि राजेश भाटिया करतायेत.

अभिनेत्री मौनी रॉयने अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती जॉन अब्राहमच्या 'रॉ' सिनेमात दिसली होती. नवाजुद्दीन सिद्धिकीच्या बोले चूडियांमध्ये दिसणार आहे.

मात्र स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार, मौनीला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. मेकर्स आणि मौनीमध्ये काही वाद झाल्यामुळे तिला सिनेमातून आऊट करण्यात आल्याचा समजतेय.

रिपोर्टनुसार मेकर्सनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून मौनीसोबत डेट्सला घेऊन प्रोब्लेम होतहोता. या सिनेमाच्या स्क्रिप्ट रीडिंगसाठी ती कधीच वेळेवर नाही आली. त्यामुळे वैतागलेल्या मेकर्सनी मौनीला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला.    

 


बोले चूडियाच्या मेकर्स लावलेल्या आरोपांवर मौनीकडून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मौनीच्या टीमचे म्हणणे आहे की, मौनीकडे आतापर्यंत अनेक सिनेमा आले आहेत. तिच्या प्रोफेशनल वर्तवणूक आणि कामाचे कौतूक सगळ्यांनी केले आहे. बोले चूडियाच्या मेकर्सनी जो दावा केला आहे त्याबाबत त्यांच्याकडे काय पुरावे आहेत ? 


बोले चूडियाची निर्मिती किरण भाटिया आणि राजेश भाटिया करतायेत. मौनीला आऊट करुन नवाजच्या अपोझिट कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागली ते अद्याप माहिती नाही. मौनी लवकरच रणबीरकपूर आणि आलिया भट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती राजकुमार रावच्या अपोझिट 'मेड इन चायना'मध्ये सुद्धा झळकणार आहे.  

Web Title: Mouni roy no longer a part of nawazuddin bole chudiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.