“ना कजरे की धार, ना मोतीयों का हार''.....'मोहरा' सिनेमातील हे गाणे तुफान गाजले होते. बघावे त्याच्या तोंडावर हे गाणे रुळायचे. सुनिल शेट्टी आणि पुनम झावर  हे गाणे चित्रीत केले गेले होते. बालपणापासूनच पूनम झावरला मॉडेलिंगची आवड होती. मुंबईत लहानाची मोठी झालेल्या पुनमने अभिनयाच्या सुरूवातीला मॉडेलिंग करायला सुरू केली. अनेक बड्या ब्रँडच्या जाहीरातींमध्ये ती झळकली. एका मॅक्झिनच्या कव्हरवर देखील तिला झळकण्याची संधी मिळाली. आणि याच मॅगेझिनने तिला सिनेमात काम करण्याची संधी मिळवून दिली.  

 

प्रोड्युसर गुलशन रॉय कपूर यांच्या टेबलावर हे मॅगझिन पडले होते. एका छोट्या सिनसाठी म्हणून त्यांनी पूनमला साईन केलं. तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचं तिने संधीचं सोनं केलं. या गाण्यामुळे पूनम प्रकाशझोतात आली.त्यानंतर पुनमने प्रोड्युसर बनायचे ठरवले.'आंच'नावाचा सिनेमाची तिने निर्मिती केली. नानाटेकर आणि परेश रावल या दोघांमुळे हा सिनेमाही हिट ठरला. अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' सिनेमात राधे माँ प्रमाणे अवतार केलेली पात्र साकारणारी अभिनेत्री होती पूनम झावर. सिनेमात अगदी छोट्या भूमिकेत ती झळकली होती.

 

पूनमने प्लॅस्टिक सर्जरीही केली आहे. त्यामुळेही तिच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. अतिशय बोल्ड स्वरूपातील फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या या फोटोंचीही तुफान चर्चा होती. तिचे फोटो सोशल मीडियावर नेटीझन्साठी लक्षवेधी ठरतात. मोहरा सिनेमात सोज्वळ अंदाजात दिसणारी पूनम आज खूप बदलली आहे. तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून आश्चर्याचा धक्का नाही लागला तर नवलच.

त्यानंतर तिने 2G सेप्ट्रम घोटाळ्यावर आधारित असणाऱ्या सिनेमामध्ये नीरा राडियाचा रोल करणारी ही पूनमच होती. वयाच्या उतारववातही तिने हॉट फोटोशूट करत सा-यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आज अनेक अभिनेत्री या लग्नानंतर म्हणा किंवा काही अन्य कारणांमुळे त्या बॉलिवूडपासून संन्यास घेतला होता. मात्र पूनम छोट्या छोट्या भूमिका करत राहिली. फक्त एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री पूनम झावर विषयी या गोष्टी जाणून हीच का ती ? असा प्रश्नही पडल्याशिवाय राहणार नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mohra Actress Poonam Jhawar Changed Now She Become Bold And Beautiful See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.