miss universe 2019 winner south africa zozibini tunzi wins 68th annual miss universe 2019 competition | Miss Universe 2019 : साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने पटकावला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब 
Miss Universe 2019 : साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने पटकावला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब 

ठळक मुद्देइव्हेंटच्या सुरुवातीला भारताचे प्रतिनिधित्व करणारी वर्तिका सिंगने देसी अवतारात पारंपरिक पोशाखासह वॉक केला.

अमेरिकेच्या अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)  हिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला. जगभरातील 90 सौंदर्यवतींना नमवत जोजिबिनीने हा किताबावर आपले नाव कोरले. भारताचे प्रतिनिधित्व करणारी वर्तिका सिंग या स्पर्धेत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
रविवारी अमेरिकेच्या अटलांटा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात जोजिबिनीच्या डोक्यावर ‘मिस युनिव्हर्स’चा ताज चढवण्यात आला, त्यावेळी ती आपले अश्रू रोखू शकली नाही. तिच्या नावाचा पुकारा होताच ती रडू लागली. गोल्डन रंगाचा सुंदर ड्रेस घातलेल्या जोजिबिनीने परिक्षकांच्या प्रश्नांना शानदार उत्तरे देत, सर्वांनाच प्रभावित केले.
जोजिबिनी ही टोस्लोची राहणारी आहे. लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधात आवाज उठवणा-या जोजिबिनीच्या मते, महिलांनी सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करायला शिकायला हवे.

भारताची वर्तिका सिंगचा देसी अवतार


इव्हेंटच्या सुरुवातीला भारताचे प्रतिनिधित्व करणारी वर्तिका सिंगने देसी अवतारात पारंपरिक पोशाखासह वॉक केला. लाल रंगाच्या लहंग्यामध्ये रॅम्पवर आलेल्या वर्तिकाने सर्वांचीच मने जिंकली. भारतातील छोट्या शहरांतील मुलींना स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. पण मी स्वप्न पाहिले आणि या स्वप्नाचा पाठलाग करत, इथपर्यंत पोहोचले, असे वर्तिका म्हणाली. अर्थात पहिल्या 10 मध्ये वर्तिका जागा मिळवू शकली नाही. याचसोबत तिचे ‘मिस युनिव्हर्स’ बनण्याचे स्वप्न भंगले.

Read in English

Web Title: miss universe 2019 winner south africa zozibini tunzi wins 68th annual miss universe 2019 competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.