ठळक मुद्देया सगळ्याची सुरुवात नोव्हेंबर 2019 मध्ये एका आर्टिकलमध्ये प्रकाशित झालेल्या फोटोपासून झाली.

फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2006 चा किताब जिंकणारी सुपर मॉडेल नताशा सूरी हिने एका व्यक्तिविरोधात पोलिसांत धाव घेत, गुन्हा दाखल केला. या व्यक्तिचे नाव फ्लिन रेमेडियोज आहे. फ्लिन गेल्या काही दिवसांपासून नताशाला त्रास देत होता. गेल्या अडीच महिन्यांपासून अश्लिल फोटोंवर नताशाला टॅग करण्याचा प्रकार त्याने चालवला होता. अखेर नताशाने मुंबईच्या दादर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
नताशाने दिलेल्या तक्रारीनुसार, फ्लिक मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून अश्लील वेबसाइटवर ब्लर अश्लील फोटोंवर नताशाच्या नावाचा वापर करत होता. इतकेच नाही तर नताशाने बिग बॉस स्पर्धक सिद्धार्थ शुक्लावर हरॅसमेंटचा आरोप केल्याची अफवाही पसरत होता.


नताशा सूरीचे वकील माधव थोरात यांनी सांगितले की, मागच्या वर्षी डिसेंबर 24 ला या सर्व प्रकरणाची माहिती सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन सेलला देण्यात आली होती. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे आता नताशाला याबाबत पोलिसात धाव घ्यावी लागली.
यासंदर्भात आयएनएस या न्यूज एजन्सीशी बोलताना नताशाने सांगितले की, या व्यक्तिने सर्वप्रथम नताशा सूरी सिंह नावाचे एक ट्विटर हॅन्डल तयार केले. त्यानंतर तो अनेक अश्लील फोटोंवर मला टॅग करु लागला. नताशा सूरी सिंग अशी कोणीही व्यक्ती नाही.  हा माणूस मला जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रकार आहे.

   
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्याची सुरुवात नोव्हेंबर 2019 मध्ये एका आर्टिकलमध्ये प्रकाशित झालेल्या फोटोपासून झाली. या आर्टिकलमध्ये बाथरुममधील एका मुलीचा ब्लर फोटो होता. फ्लिनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना नाताशाला  टॅग केले होते. यानंतर त्याने नताशा सूरी सिंग नावाने आर्टिकल्स व फोटो शेअर करणे सुरु केले. गत 24 डिसेंबरला सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेलपुढे हे प्रकरण आले.


 

Web Title: miss india world supermodel natasha suri files complaint against man for tagging in adult pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.