लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यात अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदु शर्मा यांनी खूप चांगले काम केले होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन पुढील महिन्यात २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अॅमेझॉन प्राइमने त्यांच्या ऑफिशिएल इंस्टाग्राम अकाउंटवर मिर्झापूर २ संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अॅमेझॉन प्राइमने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पुढील महिन्यात, याच दिवशी आणि याचवेळी. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना आठवण करून दिली २३ ऑक्टोबरला मिर्झापूर २चा प्रीमियर होणार आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की भौकाल. या पोस्टला खूप लाइक्स मिळत आहेत. फॅन्स कमेंट्सवर या सीरिजच्या रिलीजची वाट पाहत असल्याचे सांगत आहेत.


उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. 


'मिर्झापूर २'मध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा एक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे.

'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत. या सीरीजचे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट असून पुनीत कृष्णा यांनी ही सीरिज बनवली असून गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mirzapur Season 2: Guddu Pandit and Kalin Bhaiya will meet in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.