Mirzapur 2 : Phat ke nikla hai Guddu, Ali Fazal thanks fans for all the love | Mirzapur 2 : धमाकेदार काम केल्यानंतर गुड्डू भैयाने खास अंदाजात मानले फॅन्सचे आभार!

Mirzapur 2 : धमाकेदार काम केल्यानंतर गुड्डू भैयाने खास अंदाजात मानले फॅन्सचे आभार!

अॅमेझॉन प्राइमची लोकप्रिय वेबसीरीज मिर्झापूरचा दुसरा सीझन २२ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला आहे. मिर्झापूरची केवळ प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही प्रशंसा केली होती. आता दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तशा तर यातील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. पण गुड्डू पंडीत या भूमिकेला प्रेक्षकांचं खास प्रेम मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अली फजलने आपल्या फॅन्सला हटके अंदाजात धन्यवाद दिले आहेत.

सीरीजमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अली फजलने लिहिले की, "ज्या प्रकारे मिर्झापूर धमाका करत आहे त्याला हा फोटो फिट बसला. हाहा. तुमच्या भरभरून प्रेमासाठी धन्यवाद. मी आपल्या देशाचं एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेतृत्व करत आहे. त्यामुळे रेग्युलर वेळेवर उपलब्ध नाही. सतत काहीना काही इथे शेअर करत राहणार. बाकी भौकाल नंतर. आता जा आणि सीरीज बघा'. (Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स!)

अली फजलच्या या पोस्टला केवळ २ तासात १ लाखांपेक्षा जास्त लोकांना लाइक केले आणि शेअर केले. कमेंट बॉक्समध्ये यूजर्स अलीच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. अली फजलच्या भूमिकेचं नाव घेत अनेकांनी कमेंट केल्यात. एका यूजरने लिहिले की, "गुड्डू भईया भौकाल मचा दिए." (Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज!)

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये अली फजल आधीपेक्षा जास्त पॉवरफुल भूमिकेत दिसत आहे. यावेळी तो लंगडा दाखवला असला तरी अधिक शक्तिशाली आहे. पण त्याचा हाही अंदाज प्रेक्षकांना फार आवडतो आहे. सोबतच श्वेता त्रिपाठीने साकारलेली गोलूची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mirzapur 2 : Phat ke nikla hai Guddu, Ali Fazal thanks fans for all the love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.