मीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 10:33 AM2021-01-28T10:33:25+5:302021-01-28T10:34:43+5:30

सध्या मीरा तिच्या गोव्या व्हॅकेशनच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

mira rajput shares goa pictures caught the attention of hubby shahid kapoor adorable comment | मीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट

मीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर ती सतत तिच्या अपडेट शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे.  

शाहिद कपूरमीरा राजपूत बॉलिवूडचे एक लोकप्रिय कपल आहे. सध्या मीरा तिच्या गोव्या व्हॅकेशनच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. तसे हे फोटो व्हायरल होण्याचे एक खास कारण आहे. होय,मीराचे हे फोटो पाहून शाहिद कपूर स्वत:ला रोखू शकला नाही. मीराने हे फोटो शेअर केलेत आणि शाहिदने लगेच त्यावर कमेंट केली. मग काय, त्याच्या या फ्लर्टचीही चर्चा झाली.

मीराने गोवा व्हॅकेशनचे समुद्र किना-यावरचे दोन फोटो शेअर केलेत. ‘प्रत्येक क्षणाची जादू अनुभवा,’ असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले. यावर ‘मी ही जादू तुझ्या डोळ्यांत पाहतो,’ अशी रोमॅन्टिक कमेंट शाहिदने केली. त्याच्या या कमेंटवर चाहते फिदा झालेत.

शाहिद कपूर जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी मीरा राजपूतही लोकप्रिय आहे. म्हणायला, मीराचा फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नाही. पण तरीही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

 2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला मीराचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. 

सोशल मीडियावर ती सतत तिच्या अपडेट शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे.  वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून मीरा आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. 

  
 

 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mira rajput shares goa pictures caught the attention of hubby shahid kapoor adorable comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app