बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सिनेमांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही त्यानंतर ते एकतर दुसर्‍या क्षेत्राकडे वळले किंवा ते अनामिकपणाचे जीवन जगू लागतात. या लिस्टमध्ये बर्‍याच कलाकारांची नावे आहेत. यातील एक नाव म्हणजे मिनीषा लांबा हिचे.  अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या संघर्षाचे दिवसांना उजाळा दिला. 

कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनिषाला चित्रपट ऑफर झाला आणि २००५ मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. २००८ मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सिनेमांत ती झळकली. मात्र त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. नुकत्याच एका मुलाखतीत मिनिषाने तिच्या संघर्षाच्या दिवसांची व्यथा मांडली आहे. तिने सांगितले की त्यावेळी सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.

मिनीषा बॉलिवूडमधून अचानक गायब होण्याबद्दल उघडपणे बोलली, 'त्यावेळेस कोणालाही मला मॅनेज करायचे  नव्हते. आपण  खूप व्यस्त असल्याचे ढोंग लोक माझ्यासमोर करायची कारण त्यांना वाटायचे माझा डेब्यू म्हणजे एक आर्ट-हाऊससारखा आहे. 


मिनीषा पुढे म्हणाली, 'मी स्वत:चा हिमतीवर सगळं केलं.  माझ्याकडे कुठलीही पिचिंग नव्हते. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला असे वाटते हा नशीबाचा खेळ आहे. माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी मला स्वतःला बोलावले. मला यश राजमधून फोन आला होता. मी जे काही काम केले ते त्यांच्याकडून कॉल आला म्हणून केलं. मला कुणीच रिकमेंड नाही केलं.

 

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. तिने छूना है आसमान, तेनाली रामा, इंटरनेटवाला लव्ह यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ती बिग बॉस मध्ये देखील झळकली होती.आता मिनिषा एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Minissha lamba opens up on her struggles in bollywood says no one wanted to manage her work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.