ठळक मुद्देकॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला.

2005 साली सुजीत सरकारच्या ‘यहां’ या सिनेमातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या या हिरोईनला खरे तर पत्रकार बनायचे होते. पण अचानक ती मॉडेलिंगमध्ये आली अन् नंतर बॉलिवूडची हिरोईन झाली. आम्ही कुणाबद्दल बोलतोय हे कदाचित तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री मिनीषा लांबा हिच्याबद्दल. आज मिनीषाचा वाढदिवस.

कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. 2008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर कॉपोर्रेट,  हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक  सारख्या सिनेमांतही ती झळकली. 2017 मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा मिनीषाचा अखेरचा चित्रपट. यानंतर अद्याप एकही सिनेमा तिने साईन केलेला नाही. 

प्लास्टिक सर्जरीने बिघडला चेहरा

2005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टीक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता.  प्लॅस्टीक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

राज बब्बरच्या मुलासोबतचे अफेअर

राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरसोबतच्या अफेअरमुळे मिनीषा अचानक चर्चेत आली होती. खुद्द आर्यने  बिग बॉस 8 मध्ये याचा खुलासा केला होता. मिनीषा व आर्य दोघेही या सीझनमध्ये स्पर्धक होते. आर्यने या शोमध्ये मिनीषावर अनेक आरोप केले होते. शिवाय बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता.

गुपचूप केले लग्न

 2015मध्ये मिनीषाने बॉयफ्रेंड रियान थामसोबत गुपचूप लग्न करत सर्वांना धक्का दिला होता. रेयान नाईटक्लबचा मालक होता. दोघांनीही लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. 

प्रोफेशन पोकर प्लेअर


 फ्लॉप ठरू लागलेल्या फिल्मी करिअरमुळे मिनीषाने लॉस वेगास येथे पोकर खेळण्यास (एकप्रकारचा जुगार) सुरुवात केली. सात वर्ष पोकर खेळल्यानंतर ती सध्या प्रोफेशन पोकर प्लेयर बनली आहे. त्याचबरोबर पहिली सेलिब्रिटी पोकर प्लेयर म्हणूनही तिच्याकडे बघितले जात आहे.  


 

Web Title: minissha lamba birthday special nose surgery secret marriage know about personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.