भाऊ गेला, बाबा गेला, एक्स बॉयफ्रेन्डही गमावला..., मिलिंद सोमणच्या पत्नीनं खूप काही सोसलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:37 AM2021-09-20T10:37:39+5:302021-09-20T10:40:34+5:30

लहान वयातच अंकिताने खूप काही सहन केलं. काही घटना मनाला वेदना देतात असे तिनं म्हटलं आहे.

milind soman wife ankita konwar reaction on being abused as a child lost ex-lover | भाऊ गेला, बाबा गेला, एक्स बॉयफ्रेन्डही गमावला..., मिलिंद सोमणच्या पत्नीनं खूप काही सोसलं

भाऊ गेला, बाबा गेला, एक्स बॉयफ्रेन्डही गमावला..., मिलिंद सोमणच्या पत्नीनं खूप काही सोसलं

Next
ठळक मुद्दे2006 साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) जितका चर्चेत असतो, तितकीच त्याची बायको अंकिता कुंवरही (Ankita Konwar) चर्चेत असते. नव-यासोबतचे रोमॅन्टिक फोटो, फिटनेस व्हिडीओ अशा एक ना अनेक कारणांची तिची चर्चा असते.  2018 साली अंकिता पहिल्यांदा चर्चेत आली. होय, अंकिताने मिलिंदसोबत लग्न केलं,  तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2018 मध्ये अंकिता व मिलिंद यांनी लग्न केलं,त्यावेळी मिलिंद 52 वर्षांचा तर अंकिता 26 वर्षांची होती. आता या अंकिताने पहिल्यांदा आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा केला आहे. लहान वयातच अंकिताने खूप काही सहन केलं.  एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने आयुष्यातील दु:खद  अनुभव लोकांसमोर मांडला. काही घटना मनाला वेदना देतात असे तिनं म्हटलं आहे.

अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक  व्हिडिओ शेअर केला आहे.  यात ती म्हणते, ‘ लहानपणी मी खूप काही सहन केलं. मी हॉस्टेलमध्ये मोठी झाले. अनेक शहरात, विदेशात एकटी राहली. मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी माझा विश्वासघात केला. मी माझ्या वडिलांना गमावलं, प्रियकरांलाही गमावलं.  माझ्या दिसण्यावरून मला अनेकांनी अपमानास्पद वागणूक दिली. लोक मला अनेक विचित्र नावांनी हाक मारत. मी मिलिंद सोमणच्या प्रेमात पडले, लोकांनी त्यावरूनही मला जज केलं.  तुम्ही माझ्याकडे आशावादी पाहात असाल तर मी नक्कीच आशावादी आहे. स्वत: वर प्रेम करा, असं तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अंकिताचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अंकिताच्या या पोस्टवर मिलिंदनेही कमेंट केली आहे. ‘बेबी, आता तू हे सर्व मागे सोडून खूप पुढे आली आहे,’अशी कमेंट त्याने केली. अभिनेत्री अनुषा दांडेकर हिनेही अंकिताच्या पोस्टवर कमेंट करत, ‘मेरी अंकी’ असे लिहिलं आहे. चाहत्यांनीही अंकिताने दाखवलेल्या हिंमतीची दाद दिली आहे. 

अंकिता व मिलिंदची पहिली भेट झाली होती ती चेन्नईच्या एका हॉटेलात. त्यावेळी अंकिता एअरहोस्टेस होती. या पहिल्या भेटीतच दोघांना एकमेकांबद्दल काही खास जाणवते. त्यावेळी अंकिताच्या बॉयफ्रेन्डचा मृत्यू झाला होता. बॉयफ्रेन्डच्या अकाली निधनाच्या धक्क्याने ती आतून कोलमडली होती. अशा स्थितीत मिलिंद तिच्या आयुष्यात आला. मिलिंदने अंकिताला आधार दिला आणि तिला भूतकाळ विसरासला मदत केली. लवकरच अंकिता व मिलिंदने लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या या निर्णयाला अंकिताच्या कुटुंबाने जोरदार विरोध केला. कारण होते दोघांच्या वयातील फरक. मिलिंद हा अंकिताच्या आईपेक्षाही एका वर्षाने मोठा होता. अंकितापेक्षा 26 वर्षांनी मोठा होता. साहजिकच अंकिताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला. पण अंकिता ठाम होती. अखेर तिच्या जिद्दीपुढे आईवडिलांनी हार मानली आणि ते मिलिंदला भेटायला तयार झालेत. मिलिंद अंकिताच्या आईवडिलांना भेटला आणि या भेटीत त्याने त्यांचे असे काही मतपरिवर्तन केले की, आईवडिलांनी अगदी आनंदाने लग्नाला होकार दिला. मिलिंद व अंकिता यांचे एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आग्रह हे सगळे पाहून अखेर अंकिताच्या कुटुंबाचा विरोध निवळला. 

 

Web Title: milind soman wife ankita konwar reaction on being abused as a child lost ex-lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app