बॉलिवूडमधील सर्वात फिट असणारा आणि लव लाईफमुळे चर्चेत असणारा अभिनेता मिलिंद सोमण लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तो शिवच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच मिलिंद सोमण भगवान शिवची भूमिका साकारताना दिसणार आहे.


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार मिलिंद सोमण 'जग जननी मां वैष्णो देवी' मालिकेत शंकराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी आधी मोहित रैनाला विचारण्यात आले होते. मात्र बिझी शेड्युलमुळे मोहितने या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास नकार दिला. नंतर मालिकेच्या निर्मात्यांनी मिलिंद सोमणशी संपर्क केला.


फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मागील वर्षी तो फोर मोर शॉट्स प्लीझ, शॉर्ट फिल्म मुक्ती व बाजीराव मस्तानी चित्रपटात अंबाजी पंतच्या भूमिकेत दिसला होता.
मिलिंद त्याची पत्नी अंकिता कंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. त्या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे मिलिंदला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. 


देवों के देव महादेश मालिकेत अभिनेता मोहित रैनाने शंकराची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळाली होती.

जग जननी मां वैष्णो देवी मालिका ३० सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून मिलिंद सोमण प्रेक्षकांना भुरळ पाडणार का हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Milind Soman television debut as shiva avatar famously played by Mohit Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.