ठळक मुद्दे अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

अभिनेता मिलिंद सोमणने म्हणायला वयाची पन्नासी ओलांडलीय. पण त्याचा उत्साह पंचवीशीच्या तरूणांनाही लाजवणारा आहे. फिटनेसच्या बाबतीत मिलिंद इतका पॅशनेट अभिनेता क्वचितच कुणी असेल. म्हणूनच आजही अनेकजण मिलिंदवर फिदा आहेत. केवळ चाहतेच नाही तर मिलिंदची बेटरहाफ अंकिता ही सुद्धा मिलिंदवर अशी काही फिदा आहे की, पुन्हा त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे.
होय, मिलिंदने अलीकडे एक थ्रोबॅक फोटो शेअर केला.  थ्रोबॅक, वय 38 वर्षे, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले. या फोटोत मिलिंद एकदम इंटेन्स लूकमध्ये दिसतोय. असे असताना अंकिता फिदा होणार नाही तर काय?

‘आपण पुन्हा लग्न करूयात का? ’असे मिलिंदच्या या फोटोवर कमेंट करताना तिने लिहिले. हा ‘सिलसिला’ इथेच थांबला नाही. अंकिताच्या या कमेंटला मिलिंदनेही लगेच उत्तर दिले. ‘कधीही... कुठेही...’ असे त्याने लिहिले.  
मिलिंद हा 54 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 28 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.


 वयाच्या अंतरावरून मिलिंद व अंकिता ट्रोलही झालेत. पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

२००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो.  

Web Title: milind soman shares his throwback photo of 2003 wife asked shall we get married again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.