ठळक मुद्देमिलिंद व अंकिताने 2018 मध्ये लग्न केले. 

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांनी 2018 मध्ये लग्न केले. तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत असतात. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे हे कपल पुन्हा चर्चेत आले आहे. कारण काय तर त्यांचे फिटनेस प्रेम. होय, गेल्या आठ दिवसांपासून मिलिंद व अंकिता दोघेही घरात आहेत. अशात दोघेही फिटनेसवर अपार मेहनत घेत आहेत. जोडीला रोमान्स आहेच.
होय, मिलिंद व अंकिताने  एक रोमँटिक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मिलिंदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो बायको अंकिताला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसत आहे. पण हो हा व्हिडीओ शेअर करताना मिलिंदने एक सल्लाही दिला आहे. 

होय, नुकतेच पुशअप्स  किंवा एक्सरसाइझ करायला सुरुवात केलेल्यांनी असे काही करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्याने लिहिले आहे.


 ‘आठवा दिवस, तुमच्याकडे जे आहे त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइझ करु शकता. जे लोक नेहमी म्हणतात की वेळ नाही ते आता हे कारण देऊ शकत नाहीत. कोणत्याही औषधाशिवाय तुम्ही तुमची इम्युनिटी सिस्टीम तंदुरुस्त ठेऊ शकता. सोप्या गोष्टी ट्राय करा.  सुर्यनमस्कार घालून तुम्ही तुमचं शरीर फिट ठेऊ शकता. पण पहिल्यांदाच एक्सरसाइझ करत असाल तर आपल्या पत्नीला अशाप्रकारे उचलण्याचा प्रयत्न करू नका,’ असे मिलिंदने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.


याआधी अंकिता हेड मसाज देत असतानाचा फोटो मिलिंदने शेअर केला होता.
मिलिंद व अंकिताने 2018 मध्ये लग्न केले. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिता 28 वर्षांची आहे. दोघांमध्ये सुमारे 26 वर्षांचा फरक आहे. याऊपरही दोघांनी लग्न केले. त्यांच्या या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Milind Smilind soman wife ankita konwar sat on his back actor-doing push ups-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.