mika singh big help to actor turned watchman savi sidhu offered role in bipasha basu film aadat | सवी सिद्धूच्या नशीबाने घेतली कलाटणी, मिका सिंगने दिला ‘बिग रोल’!!

सवी सिद्धूच्या नशीबाने घेतली कलाटणी, मिका सिंगने दिला ‘बिग रोल’!!

ठळक मुद्दे‘आदत’ या चित्रपटात बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर लीड भूमिकेत आहेत.

अ‍ॅक्टरचा सिक्युरिटी गार्ड झालेल्या सवी सिद्धूची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एकेकाळी अक्षय कुमार, अनुराग कश्यप अशा दिग्गजांसोबत काम करणाऱ्या सवी सिद्धूवर परिस्थितीमुळे एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करण्याची पाळी आली. पण आता कदाचित सवी सिद्धूचे नशीब एक मोठी कलाटणी घेणार आहे. होय, सिंगर मिका सिंग सवीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. मिकाने सवी सिद्धूला आपल्या ‘आदत’ या आगामी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण रोल आॅफर केला आहे. केवळ इतकेच नाही तर सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून सवीने आपली टीम ज्वॉईन करण्यासही सांगितले आहे.
‘आदत’ या चित्रपटात बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर लीड भूमिकेत आहेत. या चित्रपटात सवीला फिट बसवण्यासाठी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर नव्याने काम होणार आहे. मिकाने अन्य काही भूमिकांसाठीही सवीच्या नावाची शिफारस केली आहे.
सवी सिद्धूने या वृत्ताला दुजोरा दिला. मिका सिंग माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, असे मला माझ्या मित्रांनी सांगितले. एक दिवस अचानक मिकाचा फोन आला. कुणीतरी आपली चेष्टा करतोय, असे मला त्यावेळी वाटते. पण मिकाने फोनवरून लगेच मला आदेश दिला. आजपासून या क्षणापासून तू सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडतोय आणि माझी टीम ज्वॉईन करतोय, असे त्याने मला सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने मला घरी बोलवले. मला घ्यायला गाडी पाठवली. काही नवे कपडे आणि जेवण दिले. येत्या १० दिवसांत मी मिका सिंगसोबत काम सुरु करेल, असे सवी सिद्धूने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mika singh big help to actor turned watchman savi sidhu offered role in bipasha basu film aadat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.