पाकिस्तानात गाणा-या मीका सिंगला ‘जोर का झटका’,भारतात बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:20 AM2019-08-15T11:20:13+5:302019-08-15T11:21:20+5:30

भारताने कलम 370 हटवल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे जवळजवळ सर्व संबंध तोडून टाकलेत. दोन्ही देशात असे तणावाचे वातावरण असताना  बॉलिवूड सिंगर मीका सिंग पाकिस्तानात गेला. नुसता गेलाच नाही तर तिथे एका कार्यक्रमात परफॉर्मन्सही दिला.

Mika Singh banned and boycotted after performance at Pervez Musharraf's relative's wedding | पाकिस्तानात गाणा-या मीका सिंगला ‘जोर का झटका’,भारतात बंदी

पाकिस्तानात गाणा-या मीका सिंगला ‘जोर का झटका’,भारतात बंदी

googlenewsNext

भारताने कलम 370 हटवल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे जवळजवळ सर्व संबंध तोडून टाकलेत. दोन्ही देशात असे तणावाचे वातावरण असताना  बॉलिवूड सिंगर मीका सिंग पाकिस्तानात गेला. नुसता गेलाच नाही तर तिथे एका कार्यक्रमात परफॉर्मन्सही दिला. पण आता हेच त्याच्या अंगलट आले आहे. आता त्याच्यावर थेट बंदी घालण्यात आली आहे.

 माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात परफॉर्मन्स करणा-या मीकाने अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या. या प्रकरणानंतरमीका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) मीकावर बंदी लादली. आता  द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेम एम्प्लॉईजनेही  (FWICE) मीका सिंग व त्याच्यासोबतच्या 14 क्रूमेंबर्सवर बंदी घातलीआहे. त्यानुसार, मीकावर भारतात कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक सिंगींग आणि अ‍ॅक्टिंग करण्यावर बंदी असेल.




 द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेम एम्प्लॉईजने यासंदर्भात सांगितले, ‘आम्हाला अशा कृत्यांबद्दल शून्य सहिष्णुता आहे आणि या सर्व लोकांचे हे देशविरोधी कृत्य म्हणून आम्ही एकमताने याचा निषेध करतो.’ ऑल इंडिया सिनेमा वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, ‘ऑल इंडिया सिनेमा वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) या गोष्टीची काळजी घेईल की, इंडस्ट्री मधील कोणीही मीका सिंहसोबत काम करणार नाही. जर कोणी असे केले तर त्यांच्याविरूद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल.’

 काय आहे प्रकरण 
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय कलाकारांवरही बंदी घातली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मीका सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मीका सिंह कराची येथे परफॉर्मन्स देताना दिसून आला होता.  जनरल मुशर्रफच्यानातेवाईकाच्या एका विशेष कार्यक्रमात मीकाने परफॉर्मन्स दिला होता. या घटनेचे पडसाद भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये उमटले.
‘काश्मीर अजूनही बंद आहे, अशा परिस्थितीत एक भारतीय गायक इथे येतो, परफॉर्मन्स देतो, पैसे कमावतो आणि निघून जातो. असे वागतो जाणून काही घडलेच नाही. यावरून लक्षात येते की, धर्म आणि देशप्रेम हे  केवळ गरिबांसाठी आहे’ अशा प्रकारे ट्विट करत पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्याहोत्या. पाकिस्तानी सरकारने या काळात एकूण 14 लोकांचा व्हिसा मंजूर केला होता. यामध्ये मीका सिंह याचे नाव होते.

Web Title: Mika Singh banned and boycotted after performance at Pervez Musharraf's relative's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.