#MeToo: sayani gupta support metoo campaign said it should come before 15-20 years | #MeToo: ‘पार्च्ड’ची अभिनेत्री सयानी गुप्तानेही सांगितली ‘मीटू’ची स्टोरी!
#MeToo: ‘पार्च्ड’ची अभिनेत्री सयानी गुप्तानेही सांगितली ‘मीटू’ची स्टोरी!

मीटू’ मोहिमेने अख्ख्या देशाला हादरवून सोडले़ अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिम पसरली आणि बघता बघता अनेक महिलांनी निर्भीड होत आपआपले भयावह अनुभव शेअर केलेत. यादरम्यान अनेक दिग्गजांन लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांत अडकले. आता ‘पार्च्ड’ या महिलाप्रधान चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सयानी गुप्ता हिनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे.
६-७ वर्षांची असताना बसमधून प्रवास करत असताना एका म्हाताऱ्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले होते. मी माझी पूर्ण ताकद एकवटून त्याच्या पायावर जोरदार लाथ मारली होती. त्याक्षणी मी केवळ हेच करू शकत होते आणि मी ते केले, असे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सयानी म्हणाली.
‘मीटू’ मोहिमेला तिने जोरदार पाठींबा दिला. हिंमत दाखवून जगासमोर आपबीती सांगणा-या महिलांचा मला अभिमान वाटतो. ही मोहिम १५-२० वर्षांआधीच सुरु व्हायला हवी होती. कारण महिलांचे लैंगिक शोषण आजचे नाही. पिढ्यान् पिढ्या त्या हे सहन करत आहेत. मी तनुश्रीची आभारी आहे की, तिने ‘मीटू’ मोहिमेला वाचा फोडली, असे सयानी म्हणाली. लैंगिक गैरवर्तन करणा-या पुरूषांवरही तिने संताप व्यक्त केला. अशा पुरूषांना भररस्त्यात बदडले पाहिजे. पण आपण कायदा हातात घेऊ शकत नाही, असेही ती म्हणाली.
सयानी अलीकडे ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटातही दिसली होती. याशिवाय जग्गा जासूस, फॅन, जॉली एलएलबी आणि बार बार देखो चित्रपटांतही ती दिसली आहे.

Web Title: #MeToo: sayani gupta support metoo campaign said it should come before 15-20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.