'Mere Brother Ki Dulhan' fame actor Ali Zafar accused of sexual harassment | 'मेरे ब्रदर की दुल्हन' फेम अभिनेता अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

'मेरे ब्रदर की दुल्हन' फेम अभिनेता अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप


मेरे ब्रदर की दुल्हन' फेम आणि पाकिस्तानी अभिनेता अली जाफरवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानी मेकअप आर्टिस्ट लीना घानीने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. लीनाच्या आधी अली जफरवर पाकिस्तानातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मीशा शफीनेदेखील लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

लीना घानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अली जफरवर सेक्शुअल हरासमेंटचे आरोप केले आहेत. याशिवाय तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लीना घानीने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात ५०० मिलिअनची नुकसान भरपाई मागितली आहे. 


 लीनाने ट्विटरवर लिहिले की, 'गेल्या अनेक वर्षांपासून मी वैयक्तिक आणि न्यायालयीन वादांचा सामना करते आहे. त्यामुळे मी आता स्वतःसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान देखील माझे घर आहे. जर आपण देशातील लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवत असू तर आपल्यावर अत्याचार होणे, प्रतिमा मलीन करणे.. योग्य आहे का?' 


अली जफर पाकिस्तान सिनेइंडस्ट्रीशिवाय बॉलिवूडच्या चित्रपटात झळकला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये त्याच्या करिअरची सुरूवात तेरे बिन लादेन चित्रपटातून केली होती.

त्यानंतर तो मेरे ब्रदर की दुल्हन, लंडन पॅरिस, न्यूयॉर्क, टोटल सियाप्पा आणि डिअर जिंदगी चित्रपटात दिसला आहे. त्याने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटासाठी गाणीदेखील गायली आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Mere Brother Ki Dulhan' fame actor Ali Zafar accused of sexual harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.