ठळक मुद्देसना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सना खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. होय, डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईसला सना डेट करत होती. खुद्द सनाने याची कबुली दिली होती. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. पण अचानक सना व लुईसचे ब्रेकअप झाले. पण या ब्रेकअपचे दु:ख पचवणे सनाला जड जातेय. अगदी अलीकडे एका इव्हेंटमध्ये सना ढसाढसा रडताना दिसली होती. आता सना एक्स-बॉयफ्रेन्ड लुईसने सनाची पोलखोल केली आहे.

होय, लुईसने त्याच्या सोशल अकाऊंटवर सनाचा एक कॉल रेकॉर्ड शेअर केला. ‘तुझी इमेज खराब करण्याचा माझा प्लान होतो,’ असे सना यात म्हणतेय.

व्हिडीओत लुईस आणि सनाचे संभाषण ऐकू येतेय.  मी तुला अपमानित केले, कारण असे करून मला सार्वजनिक जीवनात आनंद मिळतोस, असे सना म्हणते. यावर लुईस, तुझा असा काही प्लान असेल, हे मला पक्के ठाऊक होते, असे म्हणतो. यावर, हो हा माझा प्लानच होता, असे सना त्याला म्हणते. 


हा व्हिडीओ शेअर करताना लुईसने सनावर आगपाखड केलीय. ‘तू माझी खिल्ली उडवलीस, माझ्या धर्मावरून, माझ्या रंगावरून बोललीस. माझ्या कुटुंबाचाही तू अपमान केलास. माझ्या मते,तू तुझे काम केले. निश्चित यात तुला आनंद मिळाला असेल,’ असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


अद्याप सनाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलेली नाही.काही दिवसांपूर्वी सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ब्रेकअपचे कारण सांगितले होते. याशिवाय तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा एक पोस्ट शेअर केली होती. ‘त्याच्यामुळे त्याची एक विद्यार्थिनी प्रेग्नन्ट होती, हे मला कळले तेव्हा मला प्रचंड दु:ख झाले. माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे. त्याच्या याच सवयीमुळे तो अद्यापही स्ट्रगल करतोय. शेवटी देव शिक्षा देतोच,’असे तिने म्हटले होते.

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: melvin louis shares phone recording after sana khan allegations-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.