Masaba Gupta Throwback Maldives vacation photo winning heart on internet during Lockdown-SRJ | लॉकडाऊनमध्ये नीना गुप्ताच्या मुलीने शेअर केला असा फोटो तर युजर्स म्हणाले.....

लॉकडाऊनमध्ये नीना गुप्ताच्या मुलीने शेअर केला असा फोटो तर युजर्स म्हणाले.....

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची प्रसिद्ध डिझायनर आणि मुलगी मसाबा गुप्ता सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. मसाबा गुप्ताने इंस्टाग्रामवर आपल्या मालदीवचा एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मसाबा गुप्ता प्रिंट केलेल्या स्विम सूटमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये मसाबाची स्टाईल पाहण्यासारखी आहे.

 

लॉकडाऊनमध्ये मसाबाला तिचे व्हकेशनचे दिवस आठवत आहेत.  तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे.तिच्या बोल्ड अंदाजासाठी ती नेहमीच चर्चेत असते. तसेच ती तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

मसाबाच्या या फोटोवर  युजर्सने लिहिले की, 'फॅन्टेस्टिक.' तर तिथेच, दुसर्‍या फॅनने लिहिले, "सुंदर." मसाबाची तिच्या फोटोंमुळे चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही देखील तिने असे हटके फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

मसाबा गुप्तानं 2018 मध्ये दिग्दर्शक पती मधू मंटेनापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती सत्यदीप मिश्राच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. हे दोघं लॉकडाऊनच्या अगोदर गोव्यात व्हेकेशनसाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ते पुन्हा मुंबईमध्ये परतलेच नाहीत. दोघंही गोव्यात अडकल्याचं  माहिती समोर आली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Masaba Gupta Throwback Maldives vacation photo winning heart on internet during Lockdown-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.