Marathi Actor Sangram Chougule who Embarrassed The Bodybuilder Actors Also Became 3 Times Mr India and Mr Universe twice | बॉडीबिल्डर अभिनेत्यांनाही लाजवेल असा अभिनेता ६ वेळा बनला मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्सचा दोनदा मानकरी

बॉडीबिल्डर अभिनेत्यांनाही लाजवेल असा अभिनेता ६ वेळा बनला मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्सचा दोनदा मानकरी

सिनेमा असो किंवा मालिका, भूमिकेतील परफेक्शनसाठी हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असल्याचे आपण वारंवार पाहिलं आहे.कधी हे कलाकार तासनतास जिममध्ये घाम गाळतात.दुसरीकडे अभिनेत्री भूमिकेतील परफेक्शनसाठी किंवा झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत करतात,डायट करतात हेसुद्धा आपण पाहिले आहे.हे एखाद्या सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी कलाकार करत असतात. मात्र काही कलाकार असे असतात की व्यायाम,फिटनेस हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. आपल्या बॉडीवर हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात.बॉडी पिळदार ठेवण्यासाठी, ऍब्ज कमावण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या बॉडीवर प्रचंड मेहनत घेत आहेत. अशाच कलाकारांपैकी मराठीतील एक नाव म्हणजे अभिनेता संग्राम चौगुले.

2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'दंभ' या सिनेमात संग्रामने काम केले आहे.या सिनेमाला आणि यातील संग्राम्या भूमिकेला रसिकांसह समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.अभिनयासह संग्रामला जिममध्ये वर्कआऊट करण्याची आवड आहे. तो तासनतास जिममध्ये घाम गाळतो आणि डाएटसुद्धा फॉलो करतो. त्यामुळेच की काय अभिनयासह संग्रामची आणखी एक वेगळी ओळख आहे.बॉडी बिल्डिंगमध्येही संग्रामने स्वतःचा ठसा उमटवला आहे. सहा वेळा मिस्टर इंडिया तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा मिस्टर युनिव्हर्स होण्याचा मान संग्रामने मिळवला होता.संग्रामसारखी बॉडी कमावणे, फिट असावे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र संग्रामप्रमाणे पिळदार बॉडी कमावणे ही काही सोपी गोष्ट नाही.त्यासाठी संग्रामप्रमाणे जिममध्ये तासनतास मेहनत करणे आणि डाएट फॉलो करणे आवश्यक आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi Actor Sangram Chougule who Embarrassed The Bodybuilder Actors Also Became 3 Times Mr India and Mr Universe twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.