हरियाणाच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आणि त्यानंतर ख-या अर्थाने मानुषीची ओळख अख्या जगाला झाली. मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर मानुषी इतरांप्रमाणे लगेचच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे वाटत होते. मात्र ती या सगळ्या गोष्टींसाठी अपवाद ठरली आहे. 20 वर्षीय मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिला तिचं शिक्षण पूर्ण करुन एक दिवस हृदयाची डॉक्टर बनायचं आहे. त्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये अॅक्टींग करिअर करण्यास अजून तर वेळ असल्याचे स्पष्ट होते. तुर्तास मानुषीविषयी आणखीन एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेला कारणीभूत ठरले आहे तिचे हे खास फोटो. मानुषीचे ब्राइडल लुक असलेले फोटो तुफान व्हायरल झाले असून वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. तिच्या लग्नाची चर्चा आता रंगत आहे. मात्र हे फोटो तिने एका मॅगेझिनसाठी शूट केले असून तिच्या या फोटोंना तुफान पसंती मिळत आहे. ब्राइडल लूक असलेल्या फोटोत ती एखाद्या राजकुमारीसारखीच भासत आहे. 

नेहमी मानुषीच्या ग्लॅमरस फोटोंना तिचे फॅन्स कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. ब-याच वेळा तिला फिटनेस टीप्सविषयी विचारणा केली जाते. स्वतः फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी, तसेच आपली सेक्सी फिगर मेन्टेन करण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएटवरही तेवढचं लक्ष देते. मानुषी आपल्या दिवसभराचं खाणं 6 छोट्या छोट्या मिल्समध्ये विभागून घेते.असं केल्याने तिला फक्त मुबलक पोषक तत्वांनीयुक्त खाणं मिळत नाही तर सतत खाण्यासाठी तिला होणारं क्रेविंगही शांत राहतं. 

मानुषीच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यापासून होते, ज्यामध्ये ती लिंबाचा एक तुकडा टाकून पिते. असं केल्याने शरीरातून हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. दुपारच्या जेवणाआधी हलकं स्नॅक्स म्हणून मानुषी एक कप ब्लॅक कॉफीसोबत फ्रूट किंवा नारळाचं पाणी पिणं पसंत करते. नारळाचं पाणी आतडं आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय ते त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठीही मदत करतं. 


Web Title: Manushi Chhillar's Stunning Bridal Photoshoot in Seychelles
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.