अभिनेता मनोज वाजपेयी लवकरच अॅमेजॉनवरील 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजचे नुकतेच अनावरण पार पडले. यावेळी या सीरिजमधील कलाकार उपस्थित होते. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारी नामक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो गुप्त अधिकारी असतो.

मनोज वाजपेयी पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. या सीरिजबाबत मनोज वाजपेयी म्हणाला की, बऱ्याच कालावधीनंतर माझ्याकडे अशी स्क्रीप्ट आली होती आणि जेव्हा समजलं की राज व डीकेचा प्रोजेक्ट आहे तर मी आणखी उत्सुक झालो. वीस मिनिटं नरेशन सांगितल्यानंतर मी या सीरिजमधून वेबसीरिजमध्ये पदार्पण करायचा विचार केला. यापूर्वीदेखील माझ्याकडे वेबसीरिजची स्क्रीप्ट आली होती. पण, मला काहीतरी नवीन, सत्य आणि लोकांशी संबंधीत असेल, अशा स्क्रीप्टच्या शोधात होतो.  द फॅमिली मॅन वेबसीरिजमध्ये अशा एका माणसाची कथा सांगण्यात आली आहे ज्याचा संबंध फक्त भारतच नाही जगभराशी आहे.


पुरस्‍कार विजेती जोडी कृष्‍णा डी. के. आणि राज निदीमोरू यांची निर्मिती असलेली द फॅमिली मॅन ही दहा एपिसोड्सची सीरिज आहे. द फॅमिली मॅन ही रोमांचक ड्रामा-थ्रिलर सीरिज आहे. ही सीरिज एका मध्‍यमवर्गीय माणसाची कथा सादर करते.

तो नॅशनल इंटेलिजन्‍स एजेंन्‍सीच्‍या एका स्‍पेशल कक्षासाठी काम करतो. तो देशाचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. तसेच तो त्‍याच्‍या गुप्‍त, उच्‍च-दबावाच्‍या आणि कमी पगार असलेल्‍या
नोकरीच्‍या परिणामांपासून त्‍याच्‍या कुटुंबाचे संरक्षण करण्‍याचा देखील प्रयत्‍न करतो.

या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा व श्रेया धन्वंतरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


Web Title: Manoj Bajpayee Reveals At The Family Man Trailer Launch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.