ठळक मुद्देमंदिराने 1999 मध्ये निमार्ता राज कौशलसोबत लग्न केले.

रिल लाईफपेक्षाही रिअल लाईफमध्ये बोल्ड असलेली अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मंदिरा स्वत:च्या टोन्ड बॉडीचे रोज नवे फोटो शेअर करत असते. आताही मंदिराने एक नवा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे,तिचा हा फोटो कॅप्शनमुळे चर्चेत आला आहे
या फोटोत मंदिरा ब्लेजर आणि नी लेंथ बूटमध्ये दिसतेय. या फोटोला मंदिराने मजेशीर कॅप्शन दिले आहे. होय, ‘सूट बुट तर घातला, पॅन्ट कशी विसरली?’ असे मंदिराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


मंदिराने हा फोटो शेअर करायची देर की लोकांच्या कमेंट्स सुरु झाल्यात. अनेकांनी तिचा हा फोटो पाहून ‘ऐजलेस ब्युटी’ अशी कमेंट केली. तुझे वय वाढत का नाही? असा प्रश्नही अनेकांनी केला.


 मंदिराने वयाची चाळीशी ओलांडलीय. म्हणायला ती 47 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणाला विश्वास बसणार नाही.  फिट राहण्यासाठी मंदिरा केवळ जिमवर अवलंबून नाही. स्वीमिंग, योगा असे सगळे काही ती करते. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करीत असते. 


मंदिराने 1999 मध्ये निमार्ता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.  नुकतीच ती ‘साहो’ या चित्रपटात झळकली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानियां, वोडका डायरिज अशा अनेक सिनेमांत तिने काम केले आहे.

Web Title: mandira bedi wearing a blazer and captions patloon kaise bhooley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.